या स्फोटात मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.
विशेष प्रतिनिधी
बेरूत : लेबनॉनमध्ये ( Lebanon ) मंगळवारी झालेल्या सीरियल पेजर स्फोटानंतर बुधवारी लेबनॉनच्या बेका भागात आणखी एक स्फोट झाला. हा स्फोट वॉकी-टॉकी यंत्रात झाला, त्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.
याआधी मंगळवारी लेबनॉनमध्ये पेजर स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर तीन हजार लोक जखमी झाले होते. या स्फोटात हिजबुल्लाहचे सैनिकही मारले गेले. या स्फोटासाठी हिजबुल्लाने इस्रायलला जबाबदार धरले होते. मात्र, इस्त्रायली लष्कराने या स्फोटाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.
हिजबुल्लाहने वापरलेल्या वॉकी-टॉकीचा बुधवारी लेबनॉनच्या दक्षिणेकडील आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरात स्फोट झाला, असे सुरक्षा सूत्रांनी आणि एका साक्षीदाराने सांगितले.
बुधवारी पेजरद्वारे अशाच प्रकारचे स्फोट घडवून आणल्यानंतर एका दिवसात लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला आहे. आदल्या दिवशी मारल्या गेलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हिजबुल्लाह तयारी करत असताना हा स्फोट झाला.
Walkie-talkie blast after pagers in Lebanon
महत्वाच्या बातम्या
- Pakistan : पाकिस्तानात दोन हिंदू मुलींचे अपहरण; जबरदस्तीने धर्मांतर अन् विवाहाची भीती
- Jharkhand : झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरीची ED करणार चौकशी
- Eknath shinde : लोकसभेसाठी सिनेमा पाठोपाठ एकनाथ शिंदेंचे विधानसभेसाठी नाटकाद्वारे ब्रॅण्डिंग!!
- Hardeep Singh Puri : पुढील दोन दशकांत जागतिक ऊर्जेच्या मागणीत भारत 25 टक्के योगदान देईल’