• Download App
    ओबीसी एल्गार सभेत भुजबळांबरोबर सामील झालेले वडेट्टीवार नंतर म्हणाले, भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही!!; पण दरम्यानच्या काळात नेमके झाले??|Wadettiwar, who joined Bhujbal in the OBC Elgar Sabha, later said, Bhujbal's stand is not supported!!; But what exactly happened in the meantime??

    ओबीसी एल्गार सभेत भुजबळांबरोबर सामील झालेले वडेट्टीवार नंतर म्हणाले, भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही!!; पण दरम्यानच्या काळात नेमके झाले??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद टोकाला पोहोचला असताना मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी व्यक्तिगत लढाई समोर येत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण सभा गाजत असतानाच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याच जालना जिल्ह्यात ओबीसी एल्गार परिषद घेतली. या परिषदेत छगन भुजबळांबरोबरच विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार सामील झाले. त्यांनी त्या एल्गार सभेत भाषण देखील केले. सर्व ओबीसी समाजाने त्या सभेला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे भुजबळ, प्रकाश शेंडगे, वडेट्टीवारांचा हुरूप वाढला.Wadettiwar, who joined Bhujbal in the OBC Elgar Sabha, later said, Bhujbal’s stand is not supported!!; But what exactly happened in the meantime??

    पण आता मात्र विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका काहीशी बदलून छगन भुजबळांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचा दावा केला आहे. छगन भुजबळांबरोबर आपण एल्गार परिषदेत सामील झालो तरी त्यांच्या मताशी आपण सहमत नाही. आपण काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळे काँग्रेसचीच भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले.



    पण एल्गार जालन्यातली ओबीसी एल्गार परिषदेत भुजबळांसह वडेट्टीवारांची उपस्थिती आणि त्यानंतर वडेट्टीवारांनी घेतलेली भूमिका यामध्ये दरम्यानच्या काळात नेमके असे काय घडले की ज्यामुळे वडेट्टीवारांची भूमिका बदलली??, असा सवाल तयार झाला आहे.

    जालन्यात ओबीसी एल्गार परिषद 17 नोव्हेंबरला दुपारी झाली. त्यानंतर विजय वडेट्टीवार हे बारामतीला पोहोचले. ते रात्री बारामतीत शासकीय विश्रामगृहावर मुक्कामाला होते. बारामती ते 18 नोव्हेंबरला राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यांनी त्याच दिवशी सकाळी 9.00 वाजता ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र त्यातले तपशील सांगायला विजय वडेट्टीवारांनी नकार दिला.

    पण त्यानंतर आता वडेट्टीवार यांच्या भूमिकेत बदल दिसून येत आहे. वडेट्टीवारांनी ओबीसी एल्गार परिषदेत छगन भुजबळांबरोबरच भाषण केले आणि आता मात्र भुजबळांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे ते सांगत आहेत. यादरम्यानच्या काळात नेमके काय झाले??, याचे तपशील आता हळूहळू बाहेर येत आहेत.

    Wadettiwar, who joined Bhujbal in the OBC Elgar Sabha, later said, Bhujbal’s stand is not supported!!; But what exactly happened in the meantime??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य