वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मुजफ्फरनगर मधील एका वृद्ध महिलेचे उदगार सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. “विकास आणि सुरक्षेसाठी मी मतदान केले,” असे या महिलेने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. या संदर्भातले ट्विट वृत्तसंस्थेने केले आहे. “Voted for development and security”, exclaims 105-year-old grandmother in Muzaffarnagar !!
मुजफ्फरनगर मधील कुटबी गावातील मतदान केंद्रावर सकाळी भर थंडीत तिच्या नातवांसमवेत ही महिला मतदानासाठी पोहोचली. उत्साहात या महिलेने मतदान केले आणि त्यानंतर आपण विकास आणि सुरक्षेसाठी मतदान केल्याचे या तिने सांगितले. तिचे वय 105 वर्षांचे असल्याचे तिच्या नातवांनी सांगितले.
11.00 वाजेपर्यंत 20.3% मतदान
पहिल्या टप्प्यातील 58 मतदारसंघांमध्ये सकाळी 11.00 वाजेपर्यंत 20.3 % मतदान झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर मुख्य निवडणूक अधिकारी बी. डी. राम तिवारी यांनी दिली आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये काही खराबी आली होती. तेथे मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदान सर्वत्र शांततेत सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आज सकाळी आठ वाजल्यापासून 58 मतदारसंघांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, अशा आशयाचे ट्विट करून मतदारांना पुढे येऊन भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदानाची पहिल्या दोन तासातली आकडेवारी पाहता राज्यात उत्साहात मतदान सुरू असल्याचे दिसून येत आहे.
“Voted for development and security”, exclaims 105-year-old grandmother in Muzaffarnagar !!
महत्त्वाच्या बातम्या
- सातवा वेतन आयोग लागू झाल्याने PMPML कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव
- हृदयनाथांना ऑल इंडिया रेडिओतून काढले काँग्रेसच्या राजवटीत; आरोपांच्या गदारोळात गुंतलेत शिवसेनेचे संजय राऊत!!
- पीएम मोदींची मुलाखत : पंजाबमध्ये ताफा अडवल्याच्या घटनेवर मौन का? पंतप्रधानांनी दिले हे उत्तर
- Sonu Sood : देवदूत सोनू सूद ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू धावला; असा वाचवला तरुणाचा जीव …पाहा व्हिडीओ