विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याचे वेगवेगळे आकडे सोशल मीडियातून समोर आले. पाकिस्तानी सरकारने भारताच्या हल्ल्यात 31 पाकिस्तानी नागरिक मारले गेले, तर 57 जखमी झाले, असा दावा केला. परंतु भारत सरकारने आज अधिकृतरित्या दहशतवाद्यांच्या खात्म्याचा आकडा जाहीर केला. ऑपरेशन सिंदूर मध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. हा आकडा वाढू शकतो. कारण पुढील आकडेवारी मोजणे सुरू आहे, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. ani या वृत्त संस्थेने त्या संदर्भातले ट्विट केले.
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात कालच्या सरकारी ब्रीफिंग मध्ये दहशतवादी मारले गेल्याचा कुठलाही आकडा जाहीर करण्यात आला नव्हता. पण आज मात्र सरकारने अधिकृत आकडा जाहीर केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
“ऑपरेशन सिंदूर” संदर्भात सोशल मीडियातून वेगवेगळ्या फेक न्युज पसरवल्या जात आहेत. लोक वाटेल तसे आकडे फेकत आहेत. त्यातून भारताची बदनामी करण्याचा अनेकांचा डाव दिसतोय. त्यामुळे फेक न्युजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी केले.
त्याचवेळी सरकारी सूत्रांनी ऑपरेशन सिंदूर मधला आकडा जाहीर केला. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानातल्या नऊ शहरांमध्ये 21 ठिकाणांवरच्या हल्ल्यात शंभर पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. मात्र हा आकडा वाढू शकतो कारण पुढची आकडेवारी मोजणे अजून सुरू आहे, असेही सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले.
Visuals from the Pakistani city of Bahawalpur in Punjab province show
महत्वाच्या बातम्या
- Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार
- अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प
- पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!
- Operation sindoor : जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचा मिसाईल हल्ले!!