• Download App
    विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा|Vishwa Hindu Sena president announces bounty of Rs 51 lakh for beheading Narayan Rane

    विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी: शिवसेनेची उत्तर प्रदेशातील शाखा असलेल्या विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल समोर आले आहेत. तीन महिन्यांपासून फरार असलेल्या अरुण पाठक याने ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. राणे यांच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही असेही त्याने म्हटले आहे.Vishwa Hindu Sena president announces bounty of Rs 51 lakh for beheading Narayan Rane

    वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे. पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अरुण पाठकने ट्विटरवर लिहिले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठे केलं आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत.



    राणेंचा शिरच्छेद करणाºयाला 51 लाखांचं बक्षीस दिलं जाईल. तसेच, नारायण राणेंच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही.अरुण पाठकनं 2020 मध्ये नेपाळी तरुणाचं मुंडन करुन जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी भेलूपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

    तीन महिन्यांपूर्वी अरुण पाठकने कॅन्ट, सिग्रा, लंका, दुगार्कुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे वादग्रस्त पोस्टर्सही लावले होते. या प्रकरणी लंकेच्या भेलूपूरसह सिग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, पाठक सध्या फरार आहे.

    Vishwa Hindu Sena president announces bounty of Rs 51 lakh for beheading Narayan Rane

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार