• Download App
    West Bengal पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात उफाळला हिंसाचार!

    पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरोधात उफाळला हिंसाचार!

    West Bengal

    निदर्शकांची पोलिसांशी चकमक, अनेक वाहने पेटवली


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी रस्ता रोखला आणि पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना एकाच ठिकाणी निषेध करण्यास सांगितले, परंतु अचानक आंदोलकांनी निर्दिष्ट केलेल्या जागेच्या पलीकडे जाण्यास सुरुवात केली.

    यावेळी त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. पोलिस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. या हिंसाचारात अनेक पोलिसही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.



    वक्फ कायद्याविरुद्धचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. अचानक शांततापूर्ण निषेधाचे रूपांतर हिंसाचारात झाले. त्याआधी निदर्शक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अनेक निदर्शक हातात काठ्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत.

    Violence erupts in West Bengal against the Waqf Act

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’