• Download App
    उपराष्ट्रपतींनी आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले; इशारा करत होते, तोंडाने बोलण्याची दिली समज|Vice President slams AAP MP Raghav Chadha; Was hinting, gave the impression of speaking with the mouth

    उपराष्ट्रपतींनी आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले; इशारा करत होते, तोंडाने बोलण्याची दिली समज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले. जगदीप धनखर म्हणाले की, हाताने इशारे करू नका, नाहीतर तुम्ही नाचायला लागाल. तुमची मते व्यक्त करण्यासाठी तुम्ही तोंडाचा वापर करा. तुमची आता जागेवर बसा, तुमची शिकण्याची वेळ आलेली आहे.Vice President slams AAP MP Raghav Chadha; Was hinting, gave the impression of speaking with the mouth

    सदनात तुम्ही एकमेव असे व्यक्ती आहात, जे शिक्षा मिळाल्यानंतरही आनंदी आहेत. तुम्ही आधीच शिक्षा भोगलेली आहे. तुमचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. तुम्हाला या सदनाने दोषी ठरवले होते आणि त्याबद्दल तुम्हाला शिक्षाही सुनावण्यात आली होती.


    4 डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; निवडणूक निकालांचा परिणाम; महुआ-राघव चढ्ढा यांच्या मुद्द्यावरून गदारोळाची शक्यता


    प्रत्यक्षात सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घुसखोरीच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली. 23 खासदारांनी सभागृहाचे दैनंदिन कामकाज स्थगित करण्यासाठी आणि संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षांना नोटीस दिली होती. मात्र, जगदीप धनखर यांनी खासदारांची मागणी फेटाळून लावली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. यादरम्यान आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी हातवारे करण्यास सुरुवात केली. त्यावर अध्यक्ष जगदीप धनखर यांनी राघव यांना संसदेची प्रतिष्ठा राखण्याचा सल्ला दिला.

    गदारोळामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज 2 वाजेसाठी तहकूब केले. 2 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा पुन्हा गदारोळ झाला. त्यानंतर सोमवार 18 डिसेंबरपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

    राघव चड्ढा यांना ऑगस्ट 2023 मध्ये निलंबित करण्यात आले होते.

    राज्यसभेने आप खासदार राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेतले. ऑगस्ट 2023 पासून ते निलंबित होते. यासाठी भाजप खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रस्ताव दिला होता. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगशी संबंधित विधेयकावर पाच खासदारांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप ‘आप’ खासदारावर होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

    Vice President slams AAP MP Raghav Chadha; Was hinting, gave the impression of speaking with the mouth

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य