प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात एका 41 वर्षीय व्यक्तीने मद्याच्या नशेत व्हियाग्राच्या दोन गोळ्या खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला. जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डॉक्टरांनी हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे.Viagra taken with alcohol, 41-year-old man dies in Nagpur, blood clot in brain
एम्सच्या 6 डॉक्टरांच्या पथकाने गतवर्षी सप्टेंबरमध्ये हा अभ्यास सादर केला होता, जो या आठवड्यात ऑनलाइन प्रकाशित झाला आहे. मुद्रित स्वरूपात प्रकाशित करण्यापूर्वी त्याचे पुनरावलोकन केले जाईल आणि आवश्यक बदल केले जातील.
काय होती घटना…
केस स्टडीमध्ये, डॉक्टरांनी सांगितले की ही व्यक्ती एका मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये थांबली होती, जिथे त्यांनी मद्य प्राशन केल्यावर सिल्डेनाफिलच्या 50mgच्या दोन गोळ्या घेतल्या होत्या. ही औषधी व्हियाग्राच्या नावाने बाजारात विकली जाते. डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीला कोणताही वैद्यकीय आजाराचा इतिहास नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित व्यक्तीची प्रकृती ढासळू लागली. त्याला उलट्याही होत होत्या. त्याच्या मित्राने त्याला डॉक्टरांना भेटण्यास सांगितले, परंतु या व्यक्तीने सांगितले की, त्याला याआधीही आजारी वाटत होते, त्यामुळे डॉक्टरांना भेटण्याची गरज नाही.
काही वेळाने त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अभ्यासानुसार, या व्यक्तीचा सेरेब्रोव्हस्कुलर रक्तस्रावामुळे मृत्यू झाला, ज्यामध्ये मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.
पोस्टमॉर्टममध्ये मेंदूतून निघाली 300mg रक्ताची गुठळी
त्या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टेममध्ये डॉक्टरांना त्याच्या मेंदूमध्ये 300mg रक्ताची गुठळी आढळून आली. अल्कोहोल आणि ड्रग्जच्या मिश्रणाने उच्च रक्तदाब झाला आणि त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. डॉक्टरांनी अभ्यासात लिहिले आहे की, आम्ही हे दुर्मिळ प्रकरण प्रकाशित करत आहोत जेणेकरून लोकांना याची जाणीव होईल की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन औषध घेणे धोकादायक असू शकते.
Viagra taken with alcohol, 41-year-old man dies in Nagpur, blood clot in brain
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार