भारताच्या लसीकरण मोहीमेला आणखी वेग येणार
भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी घोषणा
भारतातील लसीकरण मोहीमेसाठी त्यांनी २.५ कोटी डॉलर्सची मदत
वृत्तसंस्था
नवी दिल्लीः मोदींच्या वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेला जगभरातून पाठिंबा मिळत आहे .भारताने कोरोना काळात सर्वच देशांना भरभरून मदत केली. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भारत-अमेरिकेतील सामरिक भागिदारी अधिक बळकट करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या कटिबद्धतेचं पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं. याआधी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. अमेरिका भारताला करोनावरील लसीसाठी २.५ कोटी डॉलर्सची मदत करेल, अशी घोषणा त्यांनी केली. Vasudhaiva Kutumbakam! US Secretary of State meets Prime Minister Modi; 2.5 crore aid to India for corona vaccination
ब्लिंकन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या भेटीने आनंद झाला. भारत-अमेरिकेतील सामरिक भागिदारीच्या अध्यक्ष जो बायडन यांच्या कटिबद्धतेचे स्वागत करतो. ही भागिदारी आपल्या लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या कल्याणासाठी एक बळही आहे, असं पंतप्रधान मोदी ट्वीटमध्ये म्हणाले.
ब्लिंकन हे मंगळवारी संध्याकाळी भारतात दाखल झाले. ते इतर नेत्यांनाही भेटणार आहेत. भारत आणि अमेरिका हे व्यक्तीची प्रतिष्ठा, संधीची समानता, कायद्याचे शासन, धार्मिक स्वातंत्र्यासह या मूलभूत स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, असं ब्लिंकन हे पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले होते.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत ब्लिंकन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. करोनावरील लसीसाठी अमेरिका भारताला २.५ कोटी डॉलरची मदत करेल, अशी घोषणा ब्लिंकन यांनी केली. अमेरिकेने भारताला २ कोटी डॉलरहून अधिक रकमेची करोनासंबंधी मदत दिली आहे. तसंच आपल्याला सांगताना आनंदो होतीय की, भारताच्या लसीकरणाच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अमेरिका भारताला आणखी २.५ कोटी डॉलरची मदत देईल, असं ब्लिंकन म्हणाले. अमेरिका आणि भारत करोना महामारी संपवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही मिळून काम करू, असं ब्लिंकन यांनी स्पष्ट केलं.
Vasudhaiva Kutumbakam! US Secretary of State meets Prime Minister Modi; 2.5 crore aid to India for corona vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- शोषणाविरुध्द लढतोय म्हणणाऱ्या नक्षलवाद्यांचा बुरखा फाटला, मुलींची नसबंदी करून केले जाते लैंगिक शोषण
- अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे ठाकरे सरकार एसटी कर्मचाऱ्याला घाबरले, आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत निलंबित केले
- बॅँक बुडाली तरी ग्राहकांची पाच लाखांपर्यंतची रक्कम राहणार सुरक्षित, केंद्रीय मंत्री मंडळ करणार कायदा
- ठाकरे सरकारच्या मंजुरीनंतरच फोनवरील संभाषण टॅप, माजी सीआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात दावा
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सेबीने ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड, नियमांचे केले उल्लंघन