• Download App
    'वंदे भारत स्पेशल' ट्रेन आजपासून नवी दिल्ली ते पाटणा या मार्गावर धावणार! Vande Bharat Special train will run from New Delhi to Patna from today

    ‘वंदे भारत स्पेशल’ ट्रेन आजपासून नवी दिल्ली ते पाटणा या मार्गावर धावणार!

    ही ट्रेन 900 किमीचा प्रवास 11 तास 35 मिनिटांत पूर्ण करेल. Vande Bharat Special train will run from New Delhi to Patna from today

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिवाळी किंवा छठ पूजेसाठी नागरिकांना घरी जाण्यास सोय व्हावी म्हणून रेल्वेने आजपासून (शनिवार) विशेष वंदे भारत स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही ट्रेन नवी दिल्ली ते पाटणा दरम्यान दिवाळी आणि छठ सणांसाठी धावणार आहे. Vande Bharat Special train will run from New Delhi to Patna from today

    सणासुदीच्या काळात ट्रेन आणि बसमध्ये मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत लोकांना रेल्वेचे तिकीट मिळू शकत नाही आणि सणासुदीच्या काळात त्यांना घरापर्यंत पोहोचणे कठीण होते. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेने नवी दिल्ली ते पाटणा दरम्यान विशेष वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.



    ही ट्रेन नवी दिल्ली ते पाटणा दरम्यान 900 किमी पेक्षा जास्त अंतर कापेल. दिवाळी आणि छठसाठी धावणारी ही ट्रेन 900 किमीचा प्रवास 11 तास 35 मिनिटांत पूर्ण करेल.

    वंदे भारत स्पेशल ट्रेन कोणत्या दिवशी धावणार?

    दिवाळी आणि छठसाठी वंदे भारत स्पेशल ट्रेन आठवड्यातून फक्त तीन दिवस चालवली जाईल. ही ट्रेन 11 नोव्हेंबर रोजी पटणाहून नवी दिल्लीसाठी पहिल्यांदा सुटेल. त्यानंतर ही ट्रेन 12 नोव्हेंबरला पाटणाहून नवी दिल्लीला परतेल. त्यानंतर 14 नोव्हेंबरला वंदे भारत स्टेशन ट्रेन नवी दिल्ली ते पाटणा अशी धावेल. पटणाहून ही ट्रेन १५ नोव्हेंबरला नवी दिल्लीला परतेल.

    Vande Bharat Special train will run from New Delhi to Patna from today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!