विशेष प्रतिनिधी
मुंबई : हातात लाल पुस्तक नाचवणे म्हणजे संविधानाचे रक्षण करणे होत नाही, अशा परखड शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. Rahul Gandhi
आज देशभरात मुस्लिम, दलित, आदिवासी मॉब लिंचिंग होत आहे, त्याविरोधात देशात वंचित बहुजन आघाडी लढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सत्तेत कुणावरही अन्याय नव्हता, तर सगळ्यांना न्याय होता. भारताची भूमी ही दारुल अमन आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी केले.
पण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा रोख प्रामुख्याने राहुल गांधी यांच्यावर होता. कारण तेच हातात संविधानाचे लाल पुस्तक घेऊन सगळीकडे राज्यघटना धोक्यात आल्याचा दावा करत हिंडतात, पण वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी आज त्यांना आरसा दाखवून दिला.
संघ आणि भाजप यांच्यावरही टीका
भारतीय संविधानाच्या संविधानिक संस्थांचे रक्षण आपल्याला करावे लागेल त्यासाठी राजकीय भूमिका घेऊन लढावे लागेल. देशातील चड्डी गॅंग देश संपवायला निघाले आहे, अशी टीकाही फारुख अहमद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सत्ताधारी भाजप यांच्यावर केली.
Vanchit Bahujan Aghadi’s criticism of Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबईत 4500 कोटींचा जमीन घोटाळा; मंत्री शिरसाट यांच्या चौकशीसाठी समिती, मुख्य सचिवांचा आदेश
- West Bengal : प. बंगालमध्ये बाबरी मशिदीच्या पायाभरणीचे पोस्टर; TMC आमदार म्हणाले- 6 डिसेंबरला भूमिपूजन; अयोध्येत याच दिवशी वादग्रस्त ढाचा पाडण्यात आला होता
- Imran Khan : सोशल मीडियावर इम्रान खानच्या मृत्यूची अफवा; पाक सरकार शांत, बहिणींनी सांगितले- भेटू दिले जात नाही
- Brazil : ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना 27 वर्षांची शिक्षा; निवडणुकीतील पराभवानंतर सत्तापालटाचा कट रचला होता