• Download App
    कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी।Vaccination is final option against corona

    कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. Vaccination is final option against corona

    मोदी म्हणाले, की अनेक दशकांनंतर मानवतेवर महासंकट आले आहे. वर्षांनंतरही कायम असलेल्या या कोरोनाच्या काळात आम्ही सातत्य आणि बदल यांचे मिश्रण अनुभवतो आहोत. भारतासह अनेक देशांनी दुसऱ्या लाटेबरोबर लढाई सुरू ठेवली आहे.



    प्रत्येक देशाला प्रभावित करणाऱ्या या कोरोनाने आणलेले आर्थिक संकटही तेवढेच मोठे आणि गंभीर आहे. कोविड-१९ चा प्रभाव ओसरल्यावर आपल्या ग्रहावरील जीवन पहिल्यासारखे अजिबात नसेल, असे नमूद करताना मोदी म्हणाले की मागच्या एका वर्षाच्या काळात आम्ही या आजाराचे बदलणारे स्वरूप पहिल्यापेक्षा जास्त समजून घेतले आहे.

    कोरोनाला हरवण्यासाठीचे प्रभावी हत्यार असलेली लस भारताने एका वर्षात तयार केली. या कामगिरीबद्दल भारताला आपल्या वैज्ञानिकांबद्दल अभिमान वाटतो. आमचे डॉक्टर परिचारिका, आरोग्य सेवक आणि कोरोना योद्धे यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. या काळात जे मृत्युमुखी पडले त्यांना मी अभिवादन करतो, असे मोदी म्हणाले.

    Vaccination is final option against corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!