• Download App
    स्पुटनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु, वर्षाला १० कोटी लस निर्मितीचे उद्दिष्ट Sputanic vaccine production started in India

    स्पुटनिक व्ही’ लसीचे भारतात उत्पादन सुरु, वर्षाला १० कोटी लस निर्मितीचे उद्दिष्ट

    विशेष प्रतिनिधी

    सिमला – भारतीय कंपनी पॅनाशिया बायोटेकने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे उत्पादन सुरु केले आहे. ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे वर्षाला दहा कोटी डोस पॅनाशिया कंपनी तयार करणार आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. Sputanic vaccine production started in India

    कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींनंतर रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला भारताने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. रशियातून या लसीचे डोस भारतात आल्यानंतर १४ मेपासून या लसीचे डोस देण्यास सुरुवात झाली आहे.

    पॅनाशिया बायोटेक कंपनीने हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील कारखान्यात ‘स्पुटनिक व्ही’ लसीची निर्मिती सुरु केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लशींची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता पारखली जाणार आहे.
    ‘‘स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती भारतात सुरु झाल्याने त्याचा भारताला फायदा होणार आहे. लसीकरण मोहीम वेगाने झाल्यास जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल,’’ असे पॅनाशिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी म्हटले आहे.

    Sputanic vaccine production started in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर