• Download App
    उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांचा राजीनामा, उत्तर प्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा । uttarakhand governor baby rani maurya resigns before up assembly election

    उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांचा राजीनामा, उत्तर प्रदेशातून विधानसभा निवडणूक लढवण्याची चर्चा

    uttarakhand governor baby rani maurya resigns : उत्तराखंडच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बेबी राणी मौर्य यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. त्या लवकरच यूपीच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात. यूपीमधून त्या विधानसभा निवडणूकही लढवण्याची चर्चा सुरू आहे. uttarakhand governor baby rani maurya resigns before up assembly election


    विशेष प्रतिनिधी

    देहरादून : उत्तराखंडच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बेबी राणी मौर्य यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. त्या लवकरच यूपीच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात. यूपीमधून त्या विधानसभा निवडणूकही लढवण्याची चर्चा सुरू आहे.

    बेबी राणी मौर्य आग्राच्या महापौर राहिलेल्या आहेत. त्यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल म्हणून तीन वर्षे पूर्ण केली आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

    यूपी-उत्तराखंड प्रभारी घोषित

    दुसरीकडे, भाजपने यूपी आणि उत्तराखंडसाठी आपल्या प्रभारींची घोषणा केली आहे. भाजपने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना यूपीचे निवडणूक प्रभारी बनवले आहे. तर अनुराग ठाकूर, सरोज पांडे आणि अर्जुन राम मेघवाल हे उत्तर प्रदेशातील भाजपचे सह-निवडणूक प्रभारी असतील. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. लोकसभा खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय प्रवक्ते सरदार आरपी सिंह सह-प्रभारी म्हणून असतील.

    याशिवाय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मणिपूरमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी असतील. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे पंजाबचे प्रभारी असतील, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवा भाजपचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

    uttarakhand governor baby rani maurya resigns before up assembly election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार