• Download App
    UP Assembly Elections : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सप्टेंबरमध्ये दोन दौरे, मिशन यूपीवर भाजपचा जोर । PM Narendra Modi Will Visit Two Times In Uttar Pradesh This Months Ahead Of UP Assembly Elections

    UP Assembly Elections : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सप्टेंबरमध्ये दोन दौरे, मिशन यूपीवर भाजपचा जोर

    UP Assembly Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात अलीगढ येथून करणार आहेत. यादरम्यान, ते एका जाहीर सभेलादेखील संबोधित करू शकतात. अलिगड दौऱ्यात पंतप्रधान राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाची पायाभरणी करतील. पंतप्रधान 26 सप्टेंबरला लखनऊलाही भेट देतील. त्याचबरोबर यावर्षी पीएम मोदी अयोध्येत दिवाळी साजरी करू शकतात. PM Narendra Modi Will Visit Two Times In Uttar Pradesh This Months Ahead Of UP Assembly Elections


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश निवडणूक प्रचाराची सुरुवात अलीगढ येथून करणार आहेत. यादरम्यान, ते एका जाहीर सभेलादेखील संबोधित करू शकतात. अलिगड दौऱ्यात पंतप्रधान राजा महेंद्र प्रताप विद्यापीठाची पायाभरणी करतील. पंतप्रधान 26 सप्टेंबरला लखनऊलाही भेट देतील. त्याचबरोबर यावर्षी पीएम मोदी अयोध्येत दिवाळी साजरी करू शकतात.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये अर्बन कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दिवाळीच्या दिवशी पंतप्रधान अयोध्येत आयोजित विशेष रामलीला पाहण्याची शक्यता आहे. यासह ते दीपोत्सवातही सहभागी होऊ शकतात. अयोध्येची दिवाळी खूप खास आहे. सरयू नदीचे घाट दरवर्षी हजारो दिव्यांनी सजवले जातात. दरवर्षी या दिव्यांची संख्याही वाढत आहे.

    भाजपकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

    दुसरीकडे, भाजपने यूपी आणि उत्तराखंडसाठी आपल्या प्रभारींची घोषणा केली आहे. भाजपने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना यूपीचे निवडणूक प्रभारी बनवले आहे. तर अनुराग ठाकूर, सरोज पांडे आणि अर्जुन राम मेघवाल हे उत्तर प्रदेशातील भाजपचे सह-निवडणूक प्रभारी असतील. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. लोकसभा खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय प्रवक्ते सरदार आरपी सिंह सह-प्रभारी म्हणून असतील.

    याशिवाय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मणिपूरमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी असतील. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे पंजाबचे प्रभारी असतील, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवा भाजपचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

    PM Narendra Modi Will Visit Two Times In Uttar Pradesh This Months Ahead Of UP Assembly Elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!