• Download App
    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांच्या समोर विधानसभेवर निवडून येण्याचा पेच ; पद टिकविण्यासाठी धडपड|Uttarakhand Chief Minister Tirtha Singh Rawat in difficult situation; Struggling to hold office

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांच्या समोर विधानसभेवर निवडून येण्याचा पेच ; पद टिकविण्यासाठी धडपड

    वृत्तसंस्था

    ऋषिकेश : एकीकडे विधानसभेवर निवडून यायचे आहे आणि दुसरीकडे खासदारकीचा राजीनामा द्यायचा असून मुख्यमंत्रीपद टिकवायचे, अशा तिहेरी संकटात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंग रावत सापडले आहेत. Uttarakhand Chief Minister Tirtha Singh Rawat in difficult situation; Struggling to hold office

    उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपदीनियुक्त झालेले तीर्थ रावत हे अजूनही विधानसभेचे सदस्य नाहीत. दुसरीकडे १० सप्टेंबरपर्यंत त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे राज्यात विधानपरिषद नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.



    १० मार्चला त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तीर्थ रावत यांनी मुख्यमंत्री पदी आरूढ झाले. ते सध्या पॉरी गढवाल येथील खासदार आहेत. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर त्यांनी पद सोडणे अपेक्षित आहे.

    खासदार पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. परंतु त्याने सहा महिन्यात निवडून आले पाहिजे ,अशी घटना सांगते. अन्यथा त्यांना पद गमवावे लागते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेतून निवडून आलेले नाहीत. राज्यात ते विधान परिषदेतून निवडून आले आहेत.

    उत्तराखंड मध्ये विधान परिषद नाही. त्यामुळे राज्यपाल त्यांची थेट नियुक्ती करू शकत नाहीत. असग राजकीय पेचात ते सापडले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभेवर निवडून यावे लागणार आहे. राज्यात विधानसभेच्या गंगोत्री आणि हलदवानी या दोन रिक्त जागा आहेत. या जागेसाठी पोटनिवडणूक घेऊन निवडून येण्याची त्यांना संधी आहे. या जागा एप्रिल आणि जूनपासून रिक्त आहेत. कोरोनामुळे निवडणूक आयोग पोट निवडणूक घेण्याच्या मनस्थितीत नाही.

    Uttarakhand Chief Minister Tirtha Singh Rawat in difficult situation; Struggling to hold office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार