• Download App
    उत्तरप्रदेश सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य, औद्योगिकीकरण आणि प्रगतीतही दुसºया क्रमांकावर |Uttar Pradesh is the most invested state, in terms of industrialization and progress second

    उत्तरप्रदेश सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य, औद्योगिकीकरण आणि प्रगतीतही दुसºया क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य बनले आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक गुंतवणूक होत असून, औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती या दोन्ही क्षेत्रांत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.Uttar Pradesh is the most invested state, in terms of industrialization and progress second

    भारतीय वाणिज्य मंडळाच्या (इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स) वार्षिक सत्रात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तरप्रदेश हे देशात सर्वाधिक गुंतवणूक होत असलेल्या राज्यांपैकी एक आहे. याठिकाणी गुंतवणूक करणाºया उद्योगांना विविध प्रकारच्या सरकारी सुविधांसह सुरक्षासंबंधी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.



    हा मोठा बदल मागील पाच वर्षांच्या काळात प्रत्यक्षात दिसून येत आहे. उत्कृष्ट कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या सुधारणा आदींमुळे उत्तरप्रदेशातील औद्योगिकीकरण वाढत असून, आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. 2015-16 या काळात उत्तरप्रदेश हे आर्थिक सुधारणांच्या मानांकनात भारतात सहाव्या स्थानावर होते.

    परंतु, मागील पाच वर्षांत हे स्थान दुसºया किंवा तिसºया स्थानांवर आले आहे.केंद्र सरकारच्या विविध योजना राबवण्यात उत्तरप्रदेश 25 व्या किंवा 30 व्या स्थानावर असणारे उत्तर प्रदेश आता किमान 44 योजनांची अंमलबजावणी करण्यात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असल्याचे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले,

    काही दिवसांपूर्वी राज्यात केवळ दोन द्रूतगती मार्ग (एक्स्प्रेस हायवेज) होते. आता पाच नवे मार्ग बांधण्यात आले आहेत. लवकरच राज्यात पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास येणार असून, या श्रेणीत देशात पहिल्या क्रमांकावर असेल. आपल्या सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यात क्षेत्रात नवे धोरण तयार केले असून, राज्याने यात 1.31 लाख कोटींची निर्यात केली आहे. यात आम्हाला सहावे स्थान मिळाले आहे.

    Uttar Pradesh is the most invested state, in terms of industrialization and progress second

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Fighter Jets : भारताची नॉन-कॉन्टॅक्ट युद्धतंत्राची तयारी; 6व्या पिढीच्या फायटर जेट्सवर काम; संसदेत संरक्षण समितीचा अहवाल सादर

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी

    ECI : निवडणुकीच्या जाहिरातींसाठी पक्षांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल; निवडणूक आयोगाचे निर्देश