विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीच्या उद्रेकात भारताला सर्व मदत पुरविण्याचा प्रयत्न अमेरिकेचे सरकार करीत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. USA giving all types of help to india
भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला असून विविध प्रकारची मदत अमेरिका करीत आहे. अशी मदत घेऊन सहा विमाने गेल्या आठवड्यात भारतात पोचली आहेत, असे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार विभागाचे वरिष्ठ सल्लागार एरविन मसिंगा यांनी सांगितले.
ते म्हणाले या विमानांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, जलद चाचणी किट, औषधे आणि एन९५ मास्क मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले आहे. दहा कोटी डॉलरची मदत अमेरिका करीत आहे. अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यापासून परराष्ट्रीय वकिलात आणि वाणिज्य दूतावासातील आमच्या पथकांसह संपूर्ण सरकार भारताला आवश्यणक ती मदत करण्यासाठी झटत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंीकन आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही भारतातील संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत, असे सांगून मसिंगा म्हणाले की,अमेरिकेच्या सर्व थरांमधून वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर गेल्या महिन्यात झालेला मदतीचा ओघ मी परराष्ट्र मंत्रालयातील २६ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच पाहिला आहे.
USA giving all types of help to india
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालनंतर भाजपला आता उत्तर प्रदेशात घेरण्याची शेतकरी नेत्यांची रणनिती
- पश्चिम बंगालनंतर भाजपला आता उत्तर प्रदेशात घेरण्याची शेतकरी नेत्यांची रणनिती
- चीनचे तब्बल २१ हजार किलोचे ‘लाँग मार्च’ अखेर मालदीवजवळ हिंदी महासागरात कोसळले, शास्ज्ञांनी सोडला निश्वास