हमासच्या हातून या ओलीसांची सुटका होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १३ इस्रायली ओलीसांच्या सुटकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हे मेहनतीचे फळ असल्याचे ते म्हणाले आहेत. ओलिसांच्या सुटकेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही फक्त सुरूवात आहे. आम्ही आशा करतो की उद्या आणि येत्या काही दिवसांत सर्व ओलीस सोडले जातील. हमासच्या हातून या ओलीसांची सुटका होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे बायडेन म्हणाले. US President Joe Biden reacts to the release of Israeli hostages
ते म्हणाले की, आम्ही तिन्ही देशांशी (कतार, इस्रायल आणि इजिप्त) सतत संपर्कात आहोत. जेव्हापासून हमासच्या सैनिकांनी या लोकांचे अपहरण केले आहे, तेव्हापासून आम्ही सतत यावर काम करत आहे. त्यांच्या सुटकेसाठी २४ तास काम केले. युद्धबंदीबाबत सातत्याने दबाव येत आहे आणि मग आम्हाला हा निकाल मिळाला. प्रत्येकजण प्रत्येक पैलूवर सतत लक्ष ठेवून असतो.
ओलिसांच्या सुटकेबाबत मी कतारचे अमिर, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी सातत्याने चर्चा केली आहे. खरे तर ज्या करारांतर्गत ओलीस आणि कैद्यांची सुटका करण्यात आली, तो कतार, अमेरिका आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतरच शक्य झाला. या करारानंतर चार दिवसांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे.