गिरीराजसिंह यांनी केली देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला करण्याची मागणी
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून आज संसदेत गदारोळ पाहायला मिळाला. लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात भाषण करताना राहुल गांधींनी, संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात असल्याचे म्हटले होते. यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, शिवाय भाजपानेही राहुल गांधीविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार टीका केली. त्यानंतर आज संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत, राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सभागृहात केली. Uproar in Parliament over Rahul Gandhis statement Rajnath Singh Piyush Goyal aggressive
राजनाथ सिंह म्हणाले, ‘’याच सभागृहाचे सदस्य राहुल गांधींनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला. मी मागणी करतो की, त्यांच्या विधानाची या सभागृहातील सर्व सदस्यांनी निंदा केली पाहिजे आणि त्यांना सभागृहासमोर माफी मागण्यास सांगितले पाहिजे.’’
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “एक प्रमुख विरोधी नेता परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर हल्ला करतो. त्यांनी भारतातील जनतेचा आणि संसदेचा अपमान केला आहे. भारतात भाषण स्वातंत्र्य आहे आणि खासदार संसदेत बोलू शकतात. राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी. राहुल गांधींनी संसदेत येऊन देशातील जनतेची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.’’
दिल्लीहून दोहाला निघालेल्या इंडिगो विमानात प्रवाशाचा मृत्यू, कराचीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग
दुसरीकडे, राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत गिरीराज सिंह म्हणाले की, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. “लंडनमध्ये राहुल गांधी म्हणाले की, खासदारांना संसदेत बोलू दिले जात नाही. हा लोकसभेचा अपमान आहे. या वक्तव्यावर सभागृह अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आपल्या लोकशाहीचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.” असं त्यांनी म्हटलं आहे.
गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, देश मनमानी पद्धतीने चालवला जात आहे. “मोदी राजवटीत लोकशाही चिरडली जात आहे.
Uproar in Parliament over Rahul Gandhis statement Rajnath Singh Piyush Goyal aggressive
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद! भारताच्या मदतीने तब्बल ४० लाख श्रीलंकन मुलांचे शिक्षणाचे स्वप्न होत आहे पूर्ण
- लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावरील कारवाईमुळे नितीश कुमार सर्वाधिक खूश : सुशील मोदी
- शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ : किती खाली पडाल रे, वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचे ट्वीट
- मोदी कर्नाटकात, अमित शाह केरळात; राजकीय भूकंप आंध्रात, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डींचा काँग्रेसचा राजीनामा!!