• Download App
    यूपीएचा प्रयोग फसला, आता बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन बनवण्याचा शिवसेनेचा मनसूबा!! । UPA's experiment failed, now Shiv Sena's plan to form a federation of non-BJP ruled CMs !!

    यूपीएचा प्रयोग फसला, आता बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन बनवण्याचा शिवसेनेचा मनसूबा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला विरोध करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचा प्रयोग फसला. त्यामध्ये काँग्रेसने शिवसेनेला अद्याप सामील करून घेतलेले नाही. त्याच बरोबर महाराष्ट्र सोडून गोव्यात देखील काँग्रेसने शिवसेनेला विचारात घेतले नाही. UPA’s experiment failed, now Shiv Sena’s plan to form a federation of non-BJP ruled CMs !!

    या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता एक वेगळेच राजकीय पाऊल उचलले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक फेडरेशन बनवण्याच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांना भेटणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्याच वेळी त्यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन बनविण्याचे स्पष्ट केले आहे.

    बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे फेडरेशन विचार विनिमय करून 2024 मध्ये भाजपला पर्याय देण्यासाठी मजबूतीने लोकसभेची निवडणूक लढवेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र त्यावेळी काँग्रेस प्रणित सध्या यूपीएचा प्रयोगावर त्यांनी थेट भाष्य केले नाही. शिवाय या मुख्यमंत्र्यांच्या फेडरेशनमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार की नाही या विषयी देखील कोणताही खुलासा त्यांनी केलेला नाही.

    UPA’s experiment failed, now Shiv Sena’s plan to form a federation of non-BJP ruled CMs !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते