• Download App
    Sonia Gandhi Hospitalized : सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात रुग्णालयात दाखल UPA chairperson Sonia Gandhi was admitted to Delhis Sir Gangaram Hospital

    Sonia Gandhi Hospitalized : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

    रुग्णालयाने हेल्थ बुलेटीन जारी करत दिली उपचाराबाबात माहिती

    प्रतिनिधी

    Sonia Gandhi Health Update –  दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालायत उपचार सुरू आहेत.  प्राप्त माहितीनुसार सोनिया गांधी यांच्या छातीमध्ये दुखत आहे आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. असेही सांगण्यात आले आहे की, त्यांना तापही आला होता, ज्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. UPA chairperson Sonia Gandhi was admitted to Delhis Sir Gangaram Hospital

    कसबा निवडणूक निकालाबाबात गडकरींच्या नावाने व्हॉट्स ॲप ग्रूपवर खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये व्हायरल!

    रुग्णालयाने जारी केले हेल्थ बुलेटिन –

    दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरू असताना, रुग्णालयाकडून एक हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आले. ज्यानुसार चेस्ट मेडिसन विभागाचे वरिष्ठ डॉक्टर अरुप बसू आणि त्यांची टीम सोनिया गांधींवर उपचार करत आहेत.

    राहुल गांधी लंडनला आणि सोनिया गांधी रुग्णालयात –

    मागील दोन महिन्यात सोनिया गांधींना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. राहुल गांधी लंडनला गेले असताना सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. मागीलवेळी जेव्हा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रियंका गांधी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. या अगोदरही मागील वर्षी जून महिन्यात करोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्या आले होते. तेव्हा त्या अनेक दिवस रुग्णालयात होत्या.

    UPA chairperson Sonia Gandhi was admitted to Delhis Sir Gangaram Hospital

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल