• Download App
    ओवेसींचे आव्हान स्वीकारण्यास भाजप तयार, योगी आदित्यनाथ यांचा ३०० जागांचा इरादा। UP now see political battle between Owesi and Yogi

    ओवेसींचे आव्हान स्वीकारण्यास भाजप तयार, योगी आदित्यनाथ यांचा ३०० जागांचा इरादा

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : मजलिस-ए-इत्तेहादूलचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला आव्हान दिले असेल तर भाजप कार्यकर्ते ते स्वीकारतील, असे प्रत्यूत्तर देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप तीनशेपेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्वास व्यक्त केला. UP now see political battle between Owesi and Yogi



    दरम्यान, ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची उत्तर प्रदेशात शंभर जागा लढविण्याची योजना आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासह (एसबीएसपी) त्यांनी युती केली आहे. एसबीएसपीने इतर छोट्या नऊ पक्षांसह युती केली असून त्यास भागीदारी संकल्प मोर्चा असे संबोधले आहे. सर्व जागा लढविण्याची या युतीचा निर्धार आहे.

    योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असे ओवेसी यांनी शनिवारी सांगितले होते. त्याबाबत आदित्यनाथ म्हणाले की, ओवेसीजी एक मोठे राष्ट्रीय नेते आहेत. ते प्रचारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असतात. जनतेमध्ये त्यांची स्वतःची अशी विश्वासार्हता आहे. त्यांनी आव्हान दिले असेल तर आमचे कार्यकर्ते ते स्वीकारतील.

    UP now see political battle between Owesi and Yogi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही