विशेष प्रतिनिधी
अलाहाबाद – लखीमपूर खेरी हिंसाप्रकरणाच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या एकसदस्यीय आयोग नियुक्त केला असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले.UP govt. orders enquiry in lakhimpur case
लखनौ विभागाचे पोलिस महानिरीक्षक लक्ष्मीसिंह म्हणाले की, न्यायालयीन आयोग या प्रकरणाची चौकशी करून दोषारोप न्यायालयात दाखल करेल.लखीमपूरमध्ये मोटारीने चिरडल्याने शेतकऱ्यांसह आठजण ठार झाल्याची घटना रविवारी घडली.
आयोग दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करेल, असे राज्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत त्यांच्या कुटुंबीयांनी टिकोनिया येथील घटनास्थळी काचेच्या पेटीत मृतदेह ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वा सन राज्य सरकारने दिले होते.
UP govt. orders enquiry in lakhimpur case
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु
- युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती
- मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले
- भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे