• Download App
    UP ELECTION: भाजपच्या घोषवाक्यावर जावेद अख्तरची खोचक प्रतिक्रिया "चारपैकी तीन शब्द उर्दू ;नेटकरी म्हणाले उर्दू भाषा भारतीयच|UP ELECTION: Javed Akhtar's sharp response to BJP's slogan "Three out of four words are Urdu; Netkari says Urdu language is Indian"

    UP ELECTION: भाजपच्या घोषवाक्यावर जावेद अख्तरची खोचक प्रतिक्रिया “चारपैकी तीन शब्द उर्दू ;नेटकरी म्हणाले उर्दू भाषा भारतीयच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जावेद अख्तर यांनी उत्तर प्रदेश भाजपच्या घोषवाक्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी यूपी भाजपच्या घोषणेमध्ये हिंदीसह उर्दूच्या शब्दाच्या वापरावरून
    सोशल मीडियावर याची खिल्ली उडवली मात्र नेटकर्यांनी जावेद अख्तर यांना सडेतोड प्रत्युत्तर देत उर्दू भाषा भारतीय असल्याचे म्हण्टले आहे.UP ELECTION: Javed Akhtar’s sharp response to BJP’s slogan “Three out of four words are Urdu; Netkari says Urdu language is Indian”

    जावेद अख्तर यांचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल होत असून त्यावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.



    युपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपी भाजपने ऑनलाइन प्रचार सुरू केला होता.योगी आदित्यनाथ सरकारचे यश सांगणाऱ्या या मोहिमेचे घोषवाक्य आहे, ‘सोच ईमानदार काम दमदार’. याच घोषणेवरून जावेद अख्तर यांनी भाजपवर खोचक शब्दात कमेंट केली आहे.

    जावेद अख्तर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “युपी भाजपाचे हे घोषवाक्य पाहून आनंद झाला, ‘सोच ईमानदार काम दमदार’ या चार शब्दांच्या घोषवाक्यात तीन उर्दू शब्द आहेत. ईमानदार, काम आणि दमदार हे शब्द उर्दू आहेत,” असं जावेद अख्तर म्हणाले.

    दरम्यान, जावेद अख्तर यांच्या या ट्वीटवर यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.’हिंदीप्रमाणे उर्दू देखील भारताची आहे.’ तर, काहींनी म्हटलं की, ‘सरकार हिंदी आणि उर्दूमध्ये फरक करत नाही, परंतु काही लोक दोन्ही भाषांना विभाजित करतात.’

    UP ELECTION: Javed Akhtar’s sharp response to BJP’s slogan “Three out of four words are Urdu; Netkari says Urdu language is Indian”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव