• Download App
    इंदुरमध्ये योगींच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णताकृती पुतळ्याचे अनावरण; सनातनद्वेष्टांचा घेतला समाचार, म्हणाले... Unveiling of full length statue of Lord Shiva by yogis in Idore

    इंदुरमध्ये योगींच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णताकृती पुतळ्याचे अनावरण; सनातनद्वेष्टांचा घेतला समाचार, म्हणाले…

    शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव संपूर्ण भारत साजरा करत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    इंदुर : शिवराज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त इंदुर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते  छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण  करण्यात आले . यावेळी योगी आदित्यनाथ यांनी भाषणात शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली तसेच सनातन धर्माबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांवर टीका देखील केली. Unveiling of full length statue of Shivaji Maharaj by yogis in Indore

    योगी आदित्यनाथ म्हणाले, ”हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव संपूर्ण भारत साजरा करत आहे. आज याची सुरुवात वास्तविकरित्या इंदुरनेच केली आहे. ३५० वर्षांच्या या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना करत, त्या काळातील सर्वात क्रूर आणि बलशाली मुघल साम्राज्याला आव्हान दिले. शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात हिंदवी साम्राज्याची  स्थापना केल्याने, आज ३५० वर्षानंतर त्याच सन्मानाने आणि भावनेने  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण सर्वजण करत आहोत. त्याच गौरवाने करत आहोत, ज्या गौरवाने त्या कालखंडात हिंदवी साम्राज्याच्या प्रति समर्पित प्रत्येक भारतीय  त्या कालखंडात करत होता. आज जेव्हा भारतातील प्रत्येकजण जेव्हा राष्ट्रनायकांना आठवतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या श्रद्धेने आणि सन्मानाने घेतलं जातं.

    याचबरोबर ”सत्तराव्या शतकात अशाप्रकारची शासनव्यवस्था मिळणे दुर्लभ होते. ज्यांनी लोक कल्याणाचेही काम केले, प्रजेच्या प्रति जेवढी समर्पणाची भावना होती, तेवढ्या समर्पण भावनेतून भारताच्या राष्ट्रवादाच्या या भगव्याला एका नव्या उंचीवर नेण्याचे कार्य केले होते. छत्रपती शिवरायांच्या याच शौर्य आणि पराक्रमाला  पाहून  उत्तर प्रदेशचे महान कवी भूषण यांनी म्हटले होते की,  ”दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं..”

    याशिवाय सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांवर घणाघात करताना  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  ‘त्यांना’ रामाची परंपरा आवडत नाही, ‘त्यांना’ कृष्णाची परंपरा आवडत नाही. ‘ते लोक’ अजूनही परकीय राजवटीला, परकीय आक्रमकांना आपले स्वामी मानू इच्छितात. असे म्हटले.

    Unveiling of full length statue of Shivaji Maharaj by yogis in Indore

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य