• Download App
    आरटीपीसीआर चाचणीचे नाव घेताच युनायटेड एअरलाइन्सने रिकामेच विमान नेले न्यूयॉर्कला |United Airlines cancelled its service in India

    आरटीपीसीआर चाचणीचे नाव घेताच युनायटेड एअरलाइन्सने रिकामेच विमान नेले न्यूयॉर्कला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता युनायटेड एअरलाइन्सने दिल्लीचे सर्व उड्डाणे रद्द केले आहेत. काल दिल्लीच्या विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे युनायटेड एअरलाइन्सचे विमान प्रवाशांविनाच न्यूयॉर्ककडे परत झेपावले.United Airlines cancelled its service in India

    दिल्ली विमानतळावरुन रिकामे विमान परत नेण्यासंदर्भात युनायटेड एअरलाइन्सने कोणतेही कारण सांगितले नाही. युनायटेड एअरलाइन्सकडून उड्डाण रद्द होण्याचे कारण प्रवाशांना मोबाईलवर संदेशाद्वारे पाठवण्यात आले आहे.



    त्यात म्हटले की, दिल्लीहून २३ एप्रिलची युनायटेड एअरलाइन्सची फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. भारताच्या अधिकाऱ्यांबरोबर कोविड-१९ प्रवासी नियमांवर चर्चा करण्याची गरज आहे. या प्रश्नाडवर तोडगा काढण्याचे काम केले जात असून लवकरच तो निकाली निघेल, अशी आशा आहे.

    युनायटेड एअरलाइन्सच्या निवेदनात म्हटले की, आम्हाला भारताच्या कोविड नियमातील स्पष्टता हवी आहे. त्यामुळे हवाई सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. तसेच विमान सेवा लवकरात लवकर बहाल करण्याबाबत योजना आखत आहोत, असेही नमूद केले.

    United Airlines cancelled its service in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा