• Download App
    "वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा..." स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान|Union Minister Smriti Irani challenges Rahul Gandhi to contest election from Amethi

    “वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा…” स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान

    राहुल गांधींच्या नेतृत्वावरूनही लगावला आहे टोला


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. एनडीटीव्हीशी केलेल्या संवादात स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.Union Minister Smriti Irani challenges Rahul Gandhi to contest election from Amethi

    स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीतील रिकामे रस्त्ये सांगत आहेत की त्यांना राहुल गांधींबद्दल काय वाटतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, वायनाडमधून विजय मिळवून राहुल गांधी संसदेत पोहोचले. सोमवारी स्मृती इराणी आणि राहुल गांधी दोघेही अमेठीत होते.



    स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींबाबत त्या म्हणाल्या की, त्यांनी 2019 मध्ये अमेठी सोडले होते, आज अमेठीने त्यांना सोडले आहे. “जर त्यांना आत्मविश्वास असेल तर त्यांनी वायनाडला न जाता अमेठीतून निवडणूक लढवावी.”

    सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दाखल केल्यानंतरही स्मृती इराणींनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला. त्या म्हणाले, “गांधी परिवार आपली जागा सोडेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रायबरेलीच्या लोकांना माहित आहे की अमेठीचे खासदार आणि योगी सरकार त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करत आहे.”

    राहुल गांधींच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, ” त्यांच्या INDIA आघाडीलाही राहुल गांधींवर विश्वास नाही, अन्यथा त्यांनी त्यांना नेता घोषित केले असते.”

    Union Minister Smriti Irani challenges Rahul Gandhi to contest election from Amethi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले