• Download App
    carpooling मोदी सरकारचे तीन मंत्री एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना!!

    Carpool togather : मोदी सरकारचे तीन मंत्री एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची महागाई या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिला. हे तीन केंद्रीय मंत्री आज कार पुलिंग करून एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.

    केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, जलसंपत्ती मंत्री सी. आर. पाटील आणि आणि मंत्री जी. किशन रेड्डी या तिघांनी एकाच कारमधून प्रवास करत कर्तव्य भवन म्हणजे नवीन केंद्रीय मंत्रालय गाठले.

    – शिवराज सिंह चौहानांचे निवेदन

    जागतिक युद्ध परिस्थितीमुळे जगाबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था देखील अडचणीत आली आहे. इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाचे भाव सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला बचतीचे आवाहन केले. या आवाहनाला आम्ही सुद्धा प्रतिसाद देऊन इंधन बचत करण्यासाठी एकाच कारने मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात आहोत. माझ्याबरोबर मंत्रिमंडळातले सहकारी सी. आर. पाटील आणि जी. किशन रेड्डी हे सुद्धा आहेत, असे शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितले.

    – इंधन बचतीचे मोदींचे पालन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून स्वतः त्याचे पालन करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या अनावश्यक गाड्या कमी केल्या. ते फक्त दोन किंवा तीन सुरक्षेच्या गाड्या घेऊन प्रवास करू लागले. त्या पाठोपाठ आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा मोदींचे अनुकरण केले. ते कार पुलिंग करून मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचले.

    Union Minister Shivraj Singh Chouhan says, “Patil, Kishan, and I are going carpooling

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kunal Shah : भारतीयाच्या हाती WhatsAppची धुरा! CREDचे संस्थापक कुणाल शाह बनणार नवे जागतिक प्रमुख; मेटाकडून 900 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक

    Lucknow : लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू; एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले होते

    UAE : UAE, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करू शकते; एअर डिफेन्स सिस्टिम आकाशतीरवरही चर्चा सुरू