६ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळमधील भाजपच्या कार्यालयात आले. तेथून पुन्हा कामानिमित्त ज्याठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्का आला.Union Minister Narayan Rane offers condolences to Sudhir Chavan’s family
विशेष प्रतिनिधी
कुडाळ : कुडाळ येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १६ एमआयडीसीमधीन भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायतची प्रभाग १६ मधून निवडून लढवत होते.
६ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळमधील भाजपच्या कार्यालयात आले. तेथून पुन्हा कामानिमित्त ज्याठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने ते खाली कोसळले.त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते.दरम्यान काल मंगळवारी सायंकाळी सुधीर चव्हाण यांच्या मालवण आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेविका पूजा करलकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, राजू बिडये, मोहन वराडकर, अभय कदम, यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Union Minister Narayan Rane offers condolences to Sudhir Chavan’s family
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अटकेचे वॉरंट जारी, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी न्यायालयाचा आदेश
- Weather Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात पारा शून्यावर, दोन-तीन दिवसांत अवकाळीचीही शक्यता
- बळीराजासाठी आनंदाची बातमी : कापूस पोहचला साडेदहा हजार रुपये क्विंटलवर; पन्नास वर्षांतील विक्रमी भाव
- Sri Lanka Inflation : श्रीलंकेत महागाईचा कडेलोट, टोमॅटो 200 रुपये किलो, मिरची 700 च्या पुढे, परकीय चलनसाठ्यातही मोठी घसरण