• Download App
    'राहुल गांधींचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?', लसीवरील ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले । Union Health Minister Harsh Vardhan Reply To Rahul Gandhi On His Vaccine Tweet

    ‘राहुल गांधींचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?’, लसीवरील ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले

    Rahul Gandhi :  देशातील कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचे म्हणत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच ट्विट केले की, ‘जुलै आला आहे, लस कुठे आली?’ त्यांच्या या ट्विटवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे. Union Health Minister Harsh Vardhan Reply To Rahul Gandhi On His Vaccine Tweet


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचे म्हणत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. दरम्यान, त्यांनी नुकतेच ट्विट केले की, ‘जुलै आला आहे, लस कुठे आली?’ त्यांच्या या ट्विटवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिले आहे.

    काय म्हणाले डॉ. हर्षवर्धन?

    डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विट केले की, “कालच मी जुलै महिन्यासाठी लसींच्या उपलब्धतेबाबत तथ्य समोर ठेवले. राहुल गांधींजींची अडचण काय आहे? ते वाचत नाही का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या विषाणूवर कोणतीही लस नाही. नेतृत्वात बदल होण्याबाबत कॉंग्रेसने विचार करायला हवा.”

    एवढेच नव्हे, तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधींवर जोरदार हल्ला केला आहे. रिजिजू म्हणाले, “व्यापक लसीकरण मोहिमेला बदनाम करण्यासाठी अशी बेजबाबदार विधाने पाहून खूप वाईट वाटले. भारत सरकारने 75 टक्के लस विनामूल्य दिल्यानंतर, लसीकरणाची गती वाढली आणि जूनमध्ये 11.50 कोटी डोस देण्यात आले. कृपया या प्राणघातक महामारीच्या दरम्यान राजकारण करू नका.

    तत्पूर्वी, 27 जून रोजी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची खिल्ली उडवत म्हटले होते की, “कामाची बात फक्त एक. लसीची कमतरता संपवा! बाकीचे सर्व लक्ष वळविण्याचे बहाणे आहेत.” दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “फक्त प्रत्येक देशवासीयापर्यंत लस पोहोचवा, मग भलेही मन की बात ऐकवा!”

    देशातील लसीकरणाची स्थिती काय आहे?

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लसीची 1.24 कोटींपेक्षा जास्त डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे बाकी आहेत आणि येत्या तीन दिवसांत 96,66,420 डोस त्यांना पुरवले जतील. मंत्रालयाने म्हटले की, आतापर्यंत भारत सरकारकडून (विनामूल्य) आणि राज्यांच्या थेट खरेदीमधून 32.92 कोटी डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आले आहेत.

    Union Health Minister Harsh Vardhan Reply To Rahul Gandhi On His Vaccine Tweet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!