वृत्तसंस्था
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीसमोर भारतविरोधी पोस्टर लावण्याच्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. रविवारी भारताने स्विस राजदूताला बोलावून या घटनेविषयी तीव्र निषेध नोंदवला. भारताने या घटनेवर आक्षेप नोंदवल्यावर स्वित्झर्लंडच्या राजदूतांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आश्वासन दिले आहे.Union government upset over anti-India posters in Geneva, summons Swiss ambassador
रविवारी भारताने स्वित्झर्लंडच्या राजदूताला बोलावून जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीसमोर ‘भारतविरोधी’ पोस्टर लावण्याच्या मुद्द्यावर निषेध नोंदवला.
स्विस राजदूतांचे आश्वासन- ‘भारताची चिंता गांभीर्याने घेणार’
स्वित्झर्लंडच्या राजदूताने परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) कळवले की, ते बर्नमध्ये घडलेल्या घटनेबद्दल भारताची चिंता गांभीर्याने घेतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयातील सचिवांनी (पश्चिम) रविवारी स्वित्झर्लंडच्या राजदूताची भेट घेतली आणि जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीसमोर झळकलेल्या भारतविरोधी पोस्टर्सचा मुद्दा उपस्थित केला.
स्वित्झर्लंडच्या राजदूतांचे स्पष्टीकरण
यादरम्यान स्वित्झर्लंडच्या राजदूतांनी सांगितले की, जीनिव्हामधील झळकलेले पोस्टर्स हे सर्वांसाठी राखीव असलेल्या जागेत आहेत, परंतु आम्ही कोणत्याही दाव्यांना समर्थन देत नाहीत किंवा ही स्विस सरकारची भूमिकाही दर्शवत नाही.
भारतीय विद्यार्थ्याने व्हिडिओ केला शेअर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका भारतीय विद्यार्थ्याने जीनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र इमारतीच्या बाहेरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये भारतविरोधी पोस्टर्स पाहायला मिळाले. जीनिव्हामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याने शूट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याने व्हिडिओसह ट्विट करत म्हटले की, यूएनएचआरसीच्या मुख्यालयाजवळ भारताविरुद्ध मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जात आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्याही तीव्र प्रतिक्रिया
भारतीय तरुणाच्या त्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओबाबत भारतीयांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एका युजरने म्हटले- ते आता भारताला रोखू शकत नाहीत, भारत विकसित राष्ट्र होत आहे. आणखी एक युझर म्हणाला- अनेक देशांना भारताच्या भक्कम परराष्ट्र धोरण आणि युक्रेनवर रशियाची लष्करी कारवाईवर भारताची तटस्थ भूमिका रुचलेली नाही.
जी-20 चे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सरकार अशा घटनांना गांभीर्याने घेत आहे. भारताने अनेक देशांमध्ये अशा घटनांचा सामना केला आहे. ऑस्ट्रेलियात खलिस्तानी समर्थक भारतीयांशी लढत असल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. मालदीवमधील ‘इंडिया आऊट कॅम्पेन’ हे अशाच भारतविरोधी मोहिमेचे आणखी एक उदाहरण आहे.
Union government upset over anti-India posters in Geneva, summons Swiss ambassador
महत्वाच्या बातम्या
- मेघालयात NDAचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, यूडीपीचा मुख्यमंत्री संगमा यांना लेखी पाठिंबा
- ठाकरे – शिंदे – भाजप भले भांडतील, पण बाळासाहेब ब्रँडच्याच नावाने मते मागतील!!; त्यांना काय पवार ब्रँडच्या नावाने मते मिळतील??
- ममतांवर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्याला अटक; केरळमध्ये एशिया नेट वर पोलिसांचे छापे; पण बीबीसी वरील छाप्यानंतर ओरडणारे लिबरल्स गप्प!!
- रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!