वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरूवारपर्यंतच्या सर्व नियोजित बैठका रद्द करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांची आज सायंकाळी सर्व मंत्र्यांसमवेत बैठक होणार होती. Union Cabinet reshuffle likely to take place tomorrow evening.
ती देखील रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या सायंकाळी विस्तार होऊ शकतो, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. नारायण राणे आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीत पोहोचले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ज्यांचा सहभाग व्हायचा आहे, त्यांना भाजप अध्यक्ष नड्डा आणि राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष हे स्वतः भेटत आहेत. त्यांनी संभाव्य मंत्र्यांना फोन केले आहेत, असेही वृत्त आहे.
सर्वानंद सोनोवाल, पश्चिम बंगालच्या शांतनू ठाकूर, नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे निश्चित झाल्याचे मानण्यात येत आहे. ते दिल्लीत पोहोचले आहेत.
या खेरीज अनुप्रिया पटेल, पंकज चौधरी, रिटा बहुगुणा जोशी, रामशंकर कठेरिया, वरुण गांधी, आरसीपी सिंह, लल्लन सिंह, पशुपती पारस, राहुल काँस्वा, सी. पी. जोशी यांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. यापैकी रामशंकर कठेरिया सोडून इतर सर्वजण दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त आहे.