• Download App
    Bengal Legislative council : बंगालमध्ये विधान परिषद स्थापनेचा प्रस्ताव 196 मतांनी मंजूर, विधानसभेत मतदान । bengal legislative assembly passes resolution on the creation of Bengal legislative council

    Bengal Legislative council : बंगालमध्ये विधान परिषद स्थापनेचा प्रस्ताव 196 मतांनी मंजूर, विधानसभेत मतदान, आता संसदेची मंजुरी गरजेची!

    Bengal Legislative council : बंगालमध्ये विधान परिषदेच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये बंगाल विधानसभेने विधान परिषद स्थापनेबाबतचा ठराव मंगळवारी मंजूर केला. आता याची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांतून मंजुरी लागेल. bengal legislative assembly passes resolution on the creation of Bengal legislative council


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बंगालमध्ये विधान परिषदेच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये बंगाल विधानसभेने विधान परिषद स्थापनेबाबतचा ठराव मंगळवारी मंजूर केला. आता याची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांतून मंजुरी लागेल. बंगाल विधानसभेने विधान परिषद निर्मितीसंदर्भात सभागृहात मांडलेल्या ठरावाच्या बाजूने 196 सदस्यांनी मतदान केले आणि विरोधात 69 मते पडली. मतदानादरम्यान 265 सदस्य सभागृहात उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. बंगालमध्ये विधानसभेचे अधिवेशन 2 जुलैपासून सुरू होत आहे.

    संसदेची मंजुरीही आवश्यक

    बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून विधान परिषद स्थापन झाल्यास त्यामध्ये केवळ 98 जागा असू शकतात. कारण विधान परिषदेच्या जागांची संख्या विधानसभेच्या एकूण जागांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त असू शकत नाही.

    ममता बॅनर्जी सरकारने विधानसभेत सादर केलेला विधान परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, परंतु आता तो संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेच्या बहुमताने मंजूर करावा लागेल. अशा प्रकारे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंजुरीशिवाय विधान परिषद स्थापन करता येणार नाही.

    किती राज्यांत विधान परिषद

    पश्चिम बंगालमध्ये 5 दशकांपूर्वी विधान परिषदेची एक व्यवस्था होती, परंतु नंतर ती संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर 5 जून 1952 रोजी राज्यात 51 सदस्यीय विधान परिषद स्थापन झाली. पण नंतर 21 मार्च 1969 रोजी ती रद्द करण्यात आली. तथापि, 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येताच विधान परिषद स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते.

    सध्या उत्तर प्रदेशाव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधान परिषदेची अस्तित्वात आहे. या परिषदेला विधानसभेचे वरचे सभागृहही म्हटले जाते. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही विधान परिषद होती, परंतु केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर त्याची मान्यता संपुष्टात आली.

    bengal legislative assembly passes resolution on the creation of Bengal legislative council

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसच्या शहजाद्याकडून राजा – महाराजांची मानहानी, पण नवाबी सुलतानी अत्याचारांवर बोलायची हिंमत नाही; मोदींचा कर्नाटकात घणाघात

    गुजरात-राजस्थानमध्ये सुरू होते ड्रग्जचे रॅकेट ATS-NCBने केला पर्दाफाश!

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई