विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : होऊ दे लग्नात कितीही खर्च सोने – चांदी घ्या स्वस्त, अशी अप्रत्यक्ष घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली. सीतारामन यांनी सादर केलेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात विविध करांमध्ये सूट देऊन सरकारने अनेक वस्तू स्वस्त केल्या. यात सोने-चांदी, मोबाईल, इलेक्ट्रिक कार यांचा समावेश आहे. UNION BUDGET 2024
मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी सरकारने शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.
केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल असंही अर्थमंत्री म्हणाल्या.
काय स्वस्त होणार?
- सोनं, चांदी स्वस्त होणार. सोनं-चांदीवर 6.5 % ऐवजी 6 % आयात कर
- मोबाईल चार्जरच्या किंमती 15 % कमी होणार
- मोबाईलचे सुटे भाग, कॅन्सरवरची औषधे
- पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत लिथियम बॅटरी स्वस्त
- इलेक्ट्रीक वाहने, सोलार सेट, चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू, पीवीसी फ्लेक्स बॅनर, विजेची तार यावर भरपूर कर सवलत त्यामुळे या वस्तू स्वस्त होणार.
काय महाग होणार?
प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार
प्लास्टीक उत्पादने महाग होणार
Union Budget 2024-25
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!