वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 12 डिसेंबरपर्यंत चालणारी COP28 शिखर परिषद दुबईत सुरू झाली आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले – ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करावे लागेल आणि हळूहळू त्यांचा वापर पूर्णपणे थांबवावा लागेल. कारण यामुळे कार्बन वायूचे उत्सर्जन अधिक होत आहे. त्यामुळेच जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे.UN chief said- use of fossil fuels should be stopped; India said – Coal is India’s main source of energy
यावर भारताने सांगितले की, कोळसा हाच येत्या काही वर्षांत भारताचा उर्जेचा मुख्य स्त्रोत राहील. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले- कोळसा हा भारताचा मुख्य उर्जा स्त्रोत आहे आणि भविष्यातही तसाच राहील. भारताने आपली गैर-जीवाश्म क्षमता 44% ने वाढवली असेल परंतु तरीही सुमारे 73% वीज कोळशापासून निर्माण केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुबई दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत क्वात्रा यांनी ही माहिती दिली.
दरवर्षी 4000 कोटी टन कार्बन उत्सर्जन
दरवर्षी जगभरात 40 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. त्यामुळे वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. याचे कारण जीवाश्म इंधन आहे. जागतिक स्तरावर, कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. उत्सर्जन कमी करण्यासाठी कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याची चर्चा आहे.
सध्याच्या पद्धतीने उत्सर्जन सुरू राहिल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे झाल्यास काही ठिकाणी भीषण दुष्काळ तर काही ठिकाणी विनाशकारी पूर येईल. हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेली अनेक शहरे पाण्यात बुडून त्यांचा मागमूसही पुसला जाईल.
COP28 च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेला मोदी संबोधित करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 डिसेंबर रोजी दुबई येथे होणाऱ्या COP28 च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. याशिवाय ते काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
यामध्ये पीएम मोदींशिवाय किंग चार्ल्स, ऋषी सुनक, कमल हॅरिस यांच्यासह जगभरातील 167 नेते हवामान बदलाच्या मुद्द्यावर आणि त्यावरील उपायांवर चर्चा करतील. गेल्या काही वर्षात संपूर्ण जगासमोर हवामान बदल हे सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर आले आहे. जीवाश्म इंधन आणि कार्बन उत्सर्जनाला आळा घालणे हा या बैठकीचा केंद्रबिंदू आहे.
UN chief said- use of fossil fuels should be stopped; India said – Coal is India’s main source of energy
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले