विशेष प्रतिनिधी
मुंबई : यूपीत योगींचा बुलडोझर फिरतोय गुंडा माफियांवर पण महाराष्ट्रात उद्धवना बुलडोझर फिरवायचा आहे भाजपच्या मतांवर!! अशी स्थिती महाराष्ट्रात आल्याचे उद्धव ठाकरेंच्या आजच्या वक्तव्यातून दिसले आहे. Uddhav Thackeray wants to bulldoz BJP votes in maharashtra, but forgot yogi’s bulldozer destroying mafia properties in UP
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बुलडोजर राजकारणाची आठवण काढली. महाराष्ट्रात आपल्याला हुकूमशाहीवर जनतेच्या मतांचा बुलडोझर फिरवायचा आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
प्रत्यक्षात उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर कोणाच्या मतांवर नाही, तर अतिक अहमद, मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या गुंड माफियांनी लुटलेल्या मालमत्तांवर फिरतो आहे. पण महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंना हाच बुलडोझर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहाय्याने भाजपच्या मतांवर फिरवायचा आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या कसब्यातील विजयामुळे उद्धव ठाकरेंना जॉर्ज फर्नांडिस यांच्या 1967 मधल्या लोकसभेतल्या विजयाची आठवण झाली. जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईचे बादशहा म्हणवले जाणारे काँग्रेसचे उमेदवार स. का. पाटील यांना पराभूत केले होते. तसाच रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा कसब्यातला बालेकिल्ला 30 वर्षांनी उध्वस्त केला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांची स्तुती केली. पण त्याचवेळी त्यांना यूपीतल्या बुलडोझर राजकारणाची आठवण झाल्याने महाराष्ट्रातल्या भाजपच्या मतांवर बुलडोझर फिरवण्याचे वक्तव्य केले. फक्त यूपीतला योगींचा बुलडोझर गुंड माफियांवर फिरतो आहे, एवढे मात्र उद्धव ठाकरे सोईस्कर रित्या विसरले आहेत.
Uddhav Thackeray wants to bulldoz BJP votes in maharashtra, but forgot yogi’s bulldozer destroying mafia properties in UP
महत्वाच्या बातम्या
- प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
- नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना सर्वोच्च न्यायालयात हजर करणार, 5 हजार लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली
- Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार