• Download App
    उदयनिधी, सनातन धर्म शिकण्यासाठी बारावीत बसा; अण्णामलाईंचा खोचक सल्ला Udayanidhi, sit in 12th to learn Sanatan Dharma

    उदयनिधी, सनातन धर्म शिकण्यासाठी बारावीत बसा; अण्णामलाईंचा खोचक सल्ला

    वृत्तसंस्था

    चेन्नई : डेंग्यू मलेरिया कोरोना अशी वाट्टेल तशी नावे ठेवून सनातन धर्माला बदनाम करणाऱ्या उदय निधी स्टालिन यांना तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी एक खोचक सल्ला दिला आहे. Udayanidhi, sit in 12th to learn Sanatan Dharma

    तामिळनाडूतील शालेय अभ्यासक्रमातील बारावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सनातन धर्म आणि हिंदू धर्म एकच असल्याचा उल्लेख आहे. हिंदू धर्मालाच सनातन धर्म, वैदिक धर्म अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, असे पाठ्यपुस्तकांमध्ये नमूद केले आहे. उदयनिधी स्टालिन आणि शेखर बाबू यांनी बारावीच्या वर्गात बसून त्याचे धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला के. अण्णामलाई यांनी दिला आहे.

    या संदर्भात अण्णामलाई यांनी एक ट्विट करून त्या पाठ्यपुस्तकाचा फोटोच शेअर केला आहे.

    या ट्विट मध्ये अण्णामलाई म्हणतात :

    थिरु उदयनिधी स्टॅलिन आणि थिरु सेकर बाबू यांनी सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या आवाहनाचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर हिंदू धर्म आणि सनातन धर्म भिन्न असल्याचा दावा केला. पण तामिळनाडू TN सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या इयत्ता 12 वीच्या पाठ्यपुस्तकात सनातन धर्म आणि हिंदू धर्म एकच असल्याचे म्हटले आहे. सनातन धर्म हा शाश्वत धर्म आहे, असेही त्यात नमूद केले आहे. आम्ही पी. के. शेखर बाबू आणि उदयनिधी स्टॅलिन यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या वर्गात प्रवेश घेण्याचा सल्ला देतो!!

    उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची बदनामी केल्यानंतर तामिळनाडूसह देशभर संताप उसळला असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी तामिळनाडू 1000 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी सरकारने 650 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर विविध मंदिरांच्या 5000 कोटी रुपयांच्या संपत्ती परत केल्याचेही ते म्हणाले होते. परंतु, तरी देखील तामिळनाडूतील जनतेचा संताप कमी झालेला नाही. उलट दररोज स्टालिन सरकारला प्रखर टीकेला सामोरे जावे लागत आहे.

    Udayanidhi, sit in 12th to learn Sanatan Dharma

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती