• Download App
    U. P. election - मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे मी खोटे सांगणार नाही, राहुल गांधींची वाराणसीत टोलेबाजी । U. P. election - congress leader rahul gandhi targets p m modi in varanasi pindari

    U. P. election – मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे मी खोटे सांगणार नाही, राहुल गांधींची वाराणसीत टोलेबाजी

    वृत्तसंस्था

    वाराणसी : मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे खोटे आश्वासन मी देणार नाही, अशी टोलेबाजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल यांनी वाराणसीत केली आहे. U. P. election – congress leader rahul gandhi targets p m modi in varanasi pindari

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल वाराणसीत होते. त्यांनी तेथे जोरदार रोड शो केला. सायंकाळी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. काशी विश्वनाथाच्या भक्तांना भेटले. डमरू वाजवला. वाराणसी कँट रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाहणी केली.



    राहुल गांधी हे देखील काल वाराणसीत होते. पण पंतप्रधानांच्या भरगच्च कार्यक्रमामुळे राहुल गांधींचा वाराणसी दौरा झाकोळला गेला. वाराणसीतील पिंडरीमध्ये त्यांनी काँग्रेसची सभा घेतली. या सभेत राहुल गांधी म्हणाले, की ते (मोदी) हिंदुधर्माच्या नावाने मते मागतात. पण ते खोटे बोलतात. मी मेलो तरी चालेल पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरीन असे मी खोटे सांगणार नाही. त्यांचा सगळा भर फक्त प्रचारावर आणि धर्माच्या नावाने खोटे बोलण्यावर असतो.

    -युक्रेनमधील विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारचीच

    युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. पण मंत्री सांगतात, हे विद्यार्थी भारतात वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास होऊ शकले नाहीत म्हणून युक्रेनला गेले. आता त्यांनी त्यांचे पाहावे. त्यांना परत आणण्याची जबाबदारी सरकारची नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

    U. P. election – congress leader rahul gandhi targets p m modi in varanasi pindari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते