Grievance Officer : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर लवकरच तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, तक्रार अधिकारी नेमण्याच्या अंतिम टप्प्यात ते आहेत. Twitter in the final stage of appointment of Grievance Officer, info given to Delhi High Court
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर लवकरच तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, तक्रार अधिकारी नेमण्याच्या अंतिम टप्प्यात ते आहेत.
यापूर्वी, भारतात नियुक्त केलेल्या अंतरिम तक्रार अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वास्तविक, आयटीच्या नवीन नियमांनुसार भारतीय वापरकर्त्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी दिग्गज सोशल मीडिया कंपन्यांमध्ये तक्रार अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ट्विटरने धर्मेंद्र चतुर यांना अंतरिम तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. तथापि, 21 जून रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर ट्विटरने म्हटले की, नवीन तक्रार अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात ते आले आहेत.
जेरेमी केसल होऊ शकतात नवीन अधिकारी
मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटर कंपनीचे वैश्विक कायदेशीर धोरण संचालक आणि अमेरिकन नागरिक जेरेमी केसल यांना भारतात तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त करणार आहे. तथापि, नवीन नियमांनुसार या पदावर केवळ भारतीय नागरिकांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
यापूर्वी चतुर यांनी अशावेळी राजीनामा दिला होता जेव्हा ट्विटरवर सोशल मीडियाच्या नव्या नियमांवरून सरकारच्या टीकेचा सामना करावा लागत होता. ट्विटरने हे नवीन नियम जाणीवपूर्वक न पाळल्याची टीका सरकारने केली आहे.
नवीन नियम 25 मेपासून लागू झाले
नवीन नियम 25 मेपासून लागू झाले आहेत. अतिरिक्त काळाची मुदत संपल्यानंतरही ट्विटरने आवश्यक अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्याने, ‘प्रोव्हिजन्स ऑफ प्रोटेक्शन’च्या माध्यमातून भारतातील मध्यस्थ डिजिटल प्लॅटफॉर्मवर सूट मिळण्याचा अधिकार गमावला आहे.
नवीन नियमांनुसार ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल. यामध्ये मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि भारतात तक्रार अधिकारी यांची नेमणूक इत्यादी करणे गरजेचे आहे.
सरकारने 5 जून रोजी जारी केलेल्या अंतिम नोटिसीला उत्तर देताना ट्विटरने म्हटले होते की, नवीन नियमांचे पालन करावयाचे आहे आणि लवकरच मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा तपशील शेअर केला जाईल. दरम्यान, ट्वीटरने चतूर यांना भारतासाठी अंतरिम तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.
सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांचे पालन न केल्याने ट्विटरने मध्यस्थ व्यक्तीला दिलेले कायदेशीर संरक्षण गमावले आहे आणि आता ट्विटरवरील कोणत्याही कंटेंटसाठी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
Twitter in the final stage of appointment of Grievance Officer, info given to Delhi High Court
महत्त्वाच्या बातम्या
- सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती
- का जाऊ शकते ममतांचे मुख्यमंत्रिपद? उत्तराखंड आणि पश्चिम बंगालच्या परिस्थितीत काय आहे साम्य? वाचा सविस्तर…
- पुष्करसिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर निर्णय
- मध्यप्रदेशात संध्याकाळी बनलेला रस्ता दुसऱ्या दिवशी गेला चोरीस, ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे प्रशासन हादरले
- राफेल डीलच्या चौकशीत फ्रान्सचे मोठे पाऊल, जजची झाली नियुक्ती, अनेक व्हीआयपींच्या अडचणीत वाढ