विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: रशियन तेल खरेदीवर हे वेडेपण आहे असे म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापार धोरणांवर आणि रशियन तेल खरेदीवर टीका केली आहे. peter navarro
नवारो म्हणाले, “युद्ध सुरू झाल्यानंतर लगेच भारतीय रिफायनर रशियन रिफायनरसोबत हातमिळवणी करत होते. हे वेडेपण आहे, कारण ते आमच्याकडून अन्यायकारक व्यापारातून पैसा कमावतात आणि त्याच पैशातून रशियन तेल घेतात. रशिया मग त्या पैशातून शस्त्रे खरेदी करतो.”
ही टीका अमेरिकेचे प्रमुख वाटाघाटी अधिकारी ब्रेंडन लिंच भारताच्या दौऱ्यावर येत असतानाच करण्यात आली. लिंच हे सोमवारी रात्री (१५ सप्टेंबर) भारतात दाखल झाले असून, ते भारताचे प्रमुख प्रतिनिधी राजेश अग्रवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत.
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेला ऑगस्टच्या अखेरीस ब्रेक लागला होता. कारण अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २५ टक्के दंडात्मक टॅरिफ लावले होते. त्यानंतर रशियन तेल खरेदीच्या कारणावरून आणखी २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू करण्यात आले.
या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला असून, ऑगस्टमध्ये अमेरिकेकडे जाणारी निर्यात ६.८६ अब्ज डॉलर इतकी झाली, जी जुलै महिन्यातील ८.०१ अब्ज डॉलर पेक्षा कमी आहे.
भारताने अमेरिकेला कृषी आणि दुग्धोत्पादन क्षेत्र खुले करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची प्राथमिकता असेल. त्यामुळे या रेड लाईन्स आगामी चर्चेत प्रमुख ठरणार आहेत.
मार्च-एप्रिलपासून सुरू असलेल्या या चर्चेत पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आता हे लक्ष्य ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ढकलण्यात आले आहे. दोन्ही देशांनी चर्चेला गती देण्याचे ठरवले असून, लिंच यांचा हा एकदिवसीय दौरा त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
Trump’s advisor peter navarro attacks India again over Russian oil!
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar हैदराबाद गॅझेटवरून बंजारा समाजाला उचकविण्याची शरद पवारांची खेळी
- Prof Chhokar : ADRचे संस्थापक प्रो. छोकर यांचे निधन; निवडणूक रोखे रद्द करण्यासारख्या 6 मोठ्या सुधारणा केल्या
- Sharad Pawar “साहेबांचा पक्ष” ही प्रतिमा पुसण्याचा शरद पवारांच्या भाषणातून प्रयत्न; पठाडीबाज मराठा राजकारणातून बाहेर पडायचा यत्न!!
- Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्याकडे दुहेरी पदभार गंभीर घटनाबाह्य कृत्य; असीम सरोदेंमार्फेत कायदेशीर नोटीस