Saturday, 10 May 2025
  • Download App
    पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा पराभव होणार, ममता बॅनर्जीही नंदीग्राममधून हरणार, प्रशांत किशोर यांच्या कंपनीचाच अंतर्गत सर्व्हे | Trinamool to lose in West Bengal, Mamata Banerjee to lose from Nandigram, Prashant Kishor's companys survey

    तृणमूल हारेल व ममताही नंदीग्राममधून हरणार असल्याचा प्रशांत किशोर यांचाच अंतर्गत सर्व्हे..? मात्र, सर्व्हे फेक असल्याचा दावा

    तृणमूल कॉँग्रसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या काही दिवसांपासून नंदीग्राममध्ये तळ ठोकून बसल्या असल्या तरी त्यांचा येथे पराभव होणार आहे. ममता बॅनर्जी यांचेच रणनितीकार असलेल्या प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या कंपनीच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात हे उघड झाले आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असल्याचेही या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. Trinamool to lose in West Bengal, Mamata Banerjee to lose from Nandigram, Prashant Kishor’s companys survey


    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : तृणमूल कॉँग्रसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या काही दिवसांपासून नंदीग्राममध्ये तळ ठोकून बसल्या असल्या तरी त्यांचा येथे पराभव होणार आहे. ममता बॅनर्जी यांचेच रणनितीकार असलेल्या प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या कंपनीच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात हे उघड झाले आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसचा पराभव होऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असल्याचेही या सर्व्हेक्षणात म्हटले आहे.

    ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी असलेले नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ऐन निवडणुकीच्य तोंडावर तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षांतरानंतर ममतांनी तावात येऊन आपण नंदीग्राममधून अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आणि उमेदवारी अर्जही भरला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या नंदीग्राममध्ये तळ ठोकून आहेत. मात्र, अधिकारी यांचा नंदीग्राम हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ममतांना येथे पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे आयपॅकने केलेल्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे.



    पश्चिम बंगालमध्ये गुरूवारी दुसºया टप्यात नंदीग्रामसह ३० मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याचे सर्व्हेक्षण आयपॅकने केले आहे. यातील २३ मतदारसंघात भाजपाचा विजय होणार आहे. तृणमूलला केवळ पाच जागा मिळणार आहेत. धक्कादायक म्हणजे नंदीग्रामची जागाही भाजपा जिंकणार आहे. या सर्व्हेची इमेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आयपॅकने म्हटले आहे की आम्ही सर्व काम डेस्कटॉपवर करत असल्याने स्क्रिनशॉट काढता येत नाही. त्यामुळे व्हायरल झालेला हा रिपोर्ट चुकीचा आहे.

    गेल्या आठवड्यात विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नंदीग्राममध्येही ममतांचा पराभव होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ममतांनी आपले सर्व दौरे स्थगित करून नंदीग्राममध्ये तळ ठोकला होता.

    Trinamool to lose in West Bengal, Mamata Banerjee to lose from Nandigram, Prashant Kishor’s companys survey

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!