विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी चौकशी करीत असलेल्या सीबीआयने मंगळवारी तृणमूलच्या नेत्याला अटक केली. रवी बस्के असे या नेत्याचे नाव असून तो वीरभूम जिल्ह्यातील तृणमूलसाठी कार्यरत आहे.Trinamool leader arrested in West Bengal violence case
बंगालमधील हिंसाचारात भाजपा कार्यकर्ता गौरव सरकार याच्या हत्येप्रकरणी बस्के याला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक होताच त्याला बोलपूर न्यायालयात सादर करण्यात आले. तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणी दिलीप मिर्धा या तृणमूल नेत्याला अटक झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन मे रोजी विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यावेळी तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले.
काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या घरातल्यांवर बलात्कारही करण्यात आले होते. फाशी देऊन अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. त्यामुळे या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने करावी असे आदेश कोलकत्ता उच्च न्यायालयाने दिले होते.
Trinamool leader arrested in West Bengal violence case
महत्त्वाच्या बातम्या
- टाटा ग्रुपमध्ये नोकरीची संधी, विविध कंपन्यांमध्ये ४५६४ रिक्त जागा लवकरच भरणार
- नारायण राणे यांनी सिध्द केले कोकणवरील वर्चस्व, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका
- सरकारवर टीका करणे खूप सोपे असते पण…गेल्या शंभर वर्षांपासूनच्या आरोग्यसेवेसाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना दोषी ठरविणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन कमतरतेवर तपासाचे आदेश देण्यास नकार
- श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या