• Download App
    Rahul Gandhi शिवजयंती दिली वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात "राहुल गांधी"!!

    Rahul Gandhi शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात “राहुल गांधी”!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; याला म्हणतात “राहुल गांधी”!! एरवी आपल्या विचित्र वक्तव्यांसाठी सु आणि कु प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींनी आजच्या शिवजयंतीच्या दिवशी वेगळाच “पराक्रम” केला. पुण्यतिथीच्या निमित्ताने वाहायची श्रद्धांजली त्यांनी शिवजयंती दिनीच वाहिली. पण एरवी कुठली खुसपटे काढून भाजप वर दुगाण्या झोडणाऱ्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना राहुल गांधींचे समर्थन करायची वेळ आली.

    राहुल गांधींनी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी सोशल मीडियावर ट्विट केले. या ट्विट मधून राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवाजी महाराजांकडून सतत प्रेरणा मिळाली असे त्यांनी लिहिले.

    परंतु, शिवजयंतीच्या दिवशी नमन अथवा वंदन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहण्याच्या औचित्यभंगामुळे सोशल मीडियावर ते ट्रोल झाले. अनेकांनी राहुल गांधींनी केलेल्या औचित्यभंगावर संताप व्यक्त केला. मराठी माध्यमांमध्ये तो बातम्यांचा विषय बनला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना कोर्टात खेचायची तयारी केली. परंतु काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राहुल गांधींचे समर्थन केले. तुम्ही व्याकरणात जाऊ नका. श्रद्धांजली या शब्दांमध्ये कुठलीही नकारात्मकता नाही. त्यामुळे राहुल गांधींनी चूक केलेली नाही, असा दावा त्यांनी केला. पण काँग्रेस प्रवक्त्यांच्या या दाव्यानंतरही सोशल मीडियावर राहुल गांधी ट्रोल होत राहिले.

    Tributes paid on Shiv Jayanti; This is called Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव म्हणाले- नितीश कुमार निवडणुकीपुरते ‘नवरदेव’; महाराष्ट्राप्रमाणेच खेळी होणार

    GST Registration : GST नोंदणी 3 दिवसांत उपलब्ध होईल:; मासिक कर उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्यांना फायदा; ऑक्टोबरमध्ये ₹1.96 लाख कोटी GST कलेक्शन

    Nitish Kumar : महिलांना दिलेले 10 हजार सरकार कधीही परत घेणार नाही; नितीश कुमार म्हणाले- 1.5 कोटी महिलांना पैसे दिले, जोपर्यंत महिला येतील तोपर्यंत पैसे देत राहू