• Download App
    Mohd Yunus  ढाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता harmony award घेण्यासाठी गेला लंडनला!!

    Mohd Yunus  ढाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता harmony award घेण्यासाठी गेला लंडनला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बांगलादेशातला नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता नाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून harmony award स्वीकारण्यासाठी लंडनला गेलाय. Mohd Yunus

    बांगलादेशात कट्टरतावाद्यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली लोकशाही मार्गाने निवडून आलेले शेख हसीनांचे सरकार उधळून लावले. त्या घटनेचा फायदा घेऊन नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ मोहम्मद युनूस बांगलादेशाच्या खुर्चीवर बसला. स्वतःचे आर्थिक गैरव्यवहार कार्पेट खाली झाकून त्याने सभ्यतेचा बुरखा पांघरला.

    विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली कट्टरतावाद्यांनी घातलेल्या धुमाकूळात शेकडो हिंदूंची हत्या झाली. ती या हिंसक राज्यकर्त्याने उघड्या डोळ्यांनी पाहिली. पण कट्टरतावाद्यांवर कुठली कठोर कारवाई केली नाही. उलट चीनमध्ये जाऊन भारताविरुद्ध गरळ ओकले.

    याच मोहम्मद युनूसला ब्रिटनच्या राजाने harmony award जाहीर केले. ते स्वीकारण्यासाठी मोहम्मद युनूस आज लंडनला गेला. पण लंडनला जाण्यापूर्वी त्याने बांगलादेशातल्या लोकशाहीवाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घातली. सेंट्रल ढाका परिसरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांच्या किंवा संघटनांच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करता येणार नाही असे बंदी ऑर्डरमध्ये नमूद केले. याच सेंट्रल डोक्यात मोहम्मद युनूसचे निवासस्थान आहे.

    तिथे जाऊन निदर्शकांनी कुठले नुकसान करू नये म्हणून त्याने सरसकट सगळ्याच निदर्शनांवर बंदी घातली. बांगलादेशात सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. मोहम्मद युनूसच्या सरकारला त्या निदर्शनांना आळा घालता आला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दबावा पुढे बाकी काही करता आले नाही त्यामुळे निदर्शनांवर सरसकट बंदी घालून मोहम्मद युनूस harmony award स्वीकारण्यासाठी लंडनला निघून गेला.

    Trapped in tight spot, Mohd Yunus  govt bans rallies in Dhaka’s power centre

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : बजेट 2026- राहुल म्हणाले- युवकांना काहीच मिळाले नाह, :ममता बॅनर्जींनी म्हटले- विस्कळीत अर्थसंकल्प

    Budget 2026 : भारताने बांगलादेशची मदत अर्ध्यावर आणली; मालदीव-म्यानमारचा निधीही कमी केला; भूतानसाठी वाढवून ₹2,288 कोटी केले

    Budget 2026 : बजेट 2026, स्वस्त-महाग- कर्करोगाची 17 औषधे स्वस्त; EV, सौर पॅनेलचे दर कमी होतील