• Download App
    काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट; कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन|Transformation of Kashi Vishwanath Temple; Narendra Modi inaugurates the corridor on December 13

    काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट; कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

    वृत्तसंस्था

    काशी : गंगा आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला जोडणाऱ्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे १३ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या कामाला अंतिम रूप देण्याची जोरदार तयारी सुरु आहे.Transformation of Kashi Vishwanath Temple; Narendra Modi inaugurates the corridor on December 13

    श्री काशी विश्वनाथ विशेष क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा म्हणाले की कॉरिडॉरच्या बाजूने २४ इमारती बांधल्या गेल्या आहेत आणि कॉरिडॉरला अंतिम टच देण्यात येत आहे. जे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्णपणे तयार होईल.



    कॉरिडॉरच्या बाजुच्या इमारतींच्या भिंतींवर श्लोक आणि वैदिक स्तोत्रे कोरली जात आहेत. त्यासाठी अंदाजे खर्च एक हजार कोटी आहे. दरवर्षी सात दशलक्षाहून अधिक भाविक आणि पर्यटक मंदिराला भेट देतात. सरासरी, १० हजार पेक्षा जास्त भाविक, बहुतेक वाराणसी आणि आसपासच्या भागातील, दररोज याला भेट देतात.

    सोमवारी, ४० हजार ते ५० हजार लोक मंदिरात प्रार्थना करतात. पवित्र श्रावण महिन्यात (जुलै-ऑगस्ट) सोमवारी ही संख्या ३ लाख पर्यंत जाते.५.५ लाख चौरस फुटांवर बांधलेल्या, कॉरिडॉरने मंदिर परिसरात गर्दी कमी होण्यास मोठी मदत मिळाली आहे. पूर्वी तीन बाजूंनी इमारतींनी हा परिसर वेढलेला होता.

    प्रकल्पात काय नेमके आहे

    • १० हजार लोकांसाठी ध्यान करण्यासाठी ७ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त व्यासपीठ
    • सात भव्य प्रवेशद्वार, एक कॅफेटेरिया, एक फूड कोर्ट
    • एक वैदिक आणि आध्यात्मिक ग्रंथालय
    • एक आभासी गॅलरी, पर्यटन केंद्र
    • एक बहुउद्देशीय हॉल आणि एक सुरक्षा हॉल आहे. – – कॉरिडॉरच्या बाजूनेविशेष स्काय बीम लाइट सिस्टम
    • मोदींकडून मार्च २०१९ मध्ये कॉरिडॉरची पायाभरणी – प्रकल्पासाठी ३०० हून अधिक इमारती खरेदी केल्या. – उत्तर प्रदेश सरकारने मंडळाची स्थापना केली.
    • मुख्यमंत्री आदित्यनाथकडून अनेकदा कामाची पाहणी

    Transformation of Kashi Vishwanath Temple; Narendra Modi inaugurates the corridor on December 13

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे