विशेष प्रतिनिधी
गुजरात : भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवाद विरोधी पथकासोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये गुजरातमधून सुमारे 400 कोटी रुपयांचे 77 किलो हेरॉइन जप्त केले होते. अल हुसेन या पाकिस्तानी मासेमारी नौकेतून 6 लोकांना देखील पकडले होते. आता या लोकांची ओळख पटवण्यात यश आले आहे.
Traces of heroin seized in Gujarat in Pakistan and Afghanistan?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यातील एकजण कराचीतील ड्रग व्यावसायिक लॉर्ड हाजी हंसनचा मुलगा साजित होता. पकडण्यात आलेले हे अमली पदार्थ पंजाबमध्ये जाणार होते. सध्या राजस्थानच्या तुरुंगात पंजाबमधील एक गुंड अटकेत आहे. तर या गुंडाचे नाव देखील या प्रकरणात आले आहे. आणि मुद्दा म्हणजे पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत.
पाकिस्तानी बोटीतून ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, गुजरातच्या किनारपट्टीवर सहा जणांना अटक
त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये आता तालिबान सरकार आले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार अफगाणिस्तानातील अफूची शेती आणि ड्रग्ज माफिया यांच्यावर ताबा मिळवणार की काय अशी तेथील ड्रग व्यावसायिकांना भीती आहे. त्यामुळे असलेला साठा लवकरात लवकर विकायचा आहे. त्याच मुळे भारतात हा पदार्थ खपवायचा त्यांचा हिरीरीने प्रयत्न चालू आहे. म्हणूनच भारतीय सीमेवर अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
याच सह मागे गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून देखील 600 कोटी रुपयांचे हेरॉइनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या हे देखील पाकिस्तानातून आलेले ड्रग्ज होते. असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर याच वर्षी सप्टेंबरमध्ये कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वांत मोठे हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. सुमारे 3000 किलो ड्रग्ज जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 21000 कोटी रुपये इतकी होती.
Traces of heroin seized in Gujarat in Pakistan and Afghanistan?
महत्त्वाच्या बातम्या
- लष्कराचे मिग-21 विमान कोसळले, पायलटचा मृत्यू
- महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध, रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश
- हद्दीत घुसणाऱ्यांनाच नाही सीमेपलीकडील दहशतवाद्यांनाचाही खात्मा करू शकतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ब्राम्हणांना शिव्या
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका असे सांगितले होते, गोपीचंद पडळकर यांची टीका
- खोट्या अॅट्रॉसिटींना बसणार चाप, साक्षीदार नसेल तर गुन्हा ठरू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल