• Download App
    Tony Blair targets USA

    अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील सर्व जिहादींना आसुरी आनंद, अमेरेकिचे मित्र ब्लेअर कडाडले

    वृत्तसंस्था

    लंडन : अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगातील सर्व जिहादींना आनंद झाला असल्याचे सांगत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दु:खद, धोकादायक आणि अनावश्य,क होता, असे ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे. Tony Blair targets USA



    ब्लेअर यांच्याच पंतप्रधानपदाच्या कालावधीत वीस वर्षांपूर्वी ब्रिटनने आपले सैन्य अफगाणिस्तानात उतरवले होते. सैन्यमाघारी ही अफगाणिस्तान किंवा पाश्चि मात्य देश यापैकी कोणाच्याही फायद्याची नाही, असे मत त्यांनी लेखात व्यक्त केले आहे. सैन्यमाघारीचा निर्णय घेताना अमेरिकेने ब्रिटनला अंधारात ठेवल्याचा आरोपही ब्लेअर यांनी केला.

    ज्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर पडण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना मदत करण्यासाठी तेथे अखेरपर्यंत थांबणे, हे ब्रिटनचे नैतिक कर्तव्यच आहे, असेही ब्लेअर यांनी म्हटले आहे.

    Tony Blair targets USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NCERT : NCERTने नववीच्या समाजशास्त्रातून संविधानाची प्रस्तावना हटवली; समाजवादी व धर्मनिरपेक्ष शब्दांचाही उल्लेख नाही; आणीबाणीवर स्वतंत्र विभाग जोडला

    मुखर्जी कन्येची मोदीस्तुती काँग्रेस जनांना पुन्हा खटकली!!

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमधील 6 शहिदांची नावे प्रथमच सार्वजनिक; यात 5 लष्करी, 1 हवाई दलाचा जवान