वृत्तसंस्था
लंडन : अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगातील सर्व जिहादींना आनंद झाला असल्याचे सांगत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दु:खद, धोकादायक आणि अनावश्य,क होता, असे ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे. Tony Blair targets USA
- शांघाय, लंडन, न्यूयॉर्कला दिल्लीने टाकले मागे, सर्वांधिक सीसी टीव्ही लावणाऱ्या शहरात जगात मारली बाजी
ब्लेअर यांच्याच पंतप्रधानपदाच्या कालावधीत वीस वर्षांपूर्वी ब्रिटनने आपले सैन्य अफगाणिस्तानात उतरवले होते. सैन्यमाघारी ही अफगाणिस्तान किंवा पाश्चि मात्य देश यापैकी कोणाच्याही फायद्याची नाही, असे मत त्यांनी लेखात व्यक्त केले आहे. सैन्यमाघारीचा निर्णय घेताना अमेरिकेने ब्रिटनला अंधारात ठेवल्याचा आरोपही ब्लेअर यांनी केला.
ज्यांना अफगाणिस्तानच्या बाहेर पडण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना मदत करण्यासाठी तेथे अखेरपर्यंत थांबणे, हे ब्रिटनचे नैतिक कर्तव्यच आहे, असेही ब्लेअर यांनी म्हटले आहे.
Tony Blair targets USA
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात गणेशोत्सवात रात्रीची कडक संचारबंदी; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा
- तालिबानने भारताशी संबंधांची केली मागणी , चाबहार बंदरालाही सांगितले महत्त्वाचे , काय सांगितले ते जाणून घ्या
- खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून
- रात्रभर टीव्ही चालू होता म्हणून नवर्याने बायकोचा गळा दाबून केली हत्या