टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये भारतीय शुटर्सने चमत्कार केला आहे. मनीष नरवालने सुवर्ण पदक तर सिंहराजने रौप्यपदक पटकावलं आहे. भगतनंही पदक केलं निश्चित Tokyo Paralympic: Manish Narwal’s ‘golden’ victory! Sinharaj wins ‘silver’ medal; Congratulations to the players from Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ११व्या दिवसाची भारतीय खेळाडूंनी दणक्यात सुरूवात केली. बॅटमिंटनपटू प्रमोद भगतच्या जबरदस्त प्रदर्शनानंतर नेमबाजी स्पर्धेतही भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज कौतुकास्पद कामगिरी केली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या मनीषे सुवर्ण पदकाचा वेध घेतला, तर सिंहराजने रौप्य पदक पटकावलं.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ११व्या दिवशी शूटर मनीष नरवाल आणि सिंहराजने एसएच-१ श्रेणीतील नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्टल प्रकारात चांगली कामगिरी केली. दोघांनीही क्वॉलिफिकेशन फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
अंतिम फेरीत मनीष नरवालने अचूक लक्ष्यभेद करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तर सिंहराजनेही रौप्य पदकाची कमाई केली. यामुळे भारताच्या खात्यात आणखी दोन पदकं जमा झाली आहेत.
नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीष आणि सिंहराज यांचं अभिनंदनपर ट्विट केलं आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अभिमानास्पद कामगिरी सुरु आहे. तरुण आणि अतिशय हुशार मनीष नरवाल यांने मोठे यश मिळवलं आहे. पॅराऑलिम्पिकमधील पदकं हा भारतीय खेळांसाठी एक खास क्षण आहे. त्यांचं अभिनंदन. भविष्यासाठी शुभेच्छा.
Tokyo Paralympic: Manish Narwal’s ‘golden’ victory! Sinharaj wins ‘silver’ medal; Congratulations to the players from Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सीबीआयचे दिल्ली,पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे
- सुब्रमण्यम यांचे पीएम मोदींना पत्र, हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील विलंबामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे
- कोरोना हाताळण्यात अपयश, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देणार राजीनामा